आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वाकांक्षी थेरेसांनी घेतली ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनच्या १०० वर्षांच्या इतिहासातील दुसऱ्या दीर्घकाळ महिला गृहमंत्री राहिलेल्या थेरेसा मे यांनी बुधवारी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली आणि डाऊनिंग स्ट्रीटमध्ये प्रवेश केला. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या ५९ वर्षीय थेरेसा यांच्याकडे सूत्रे दिल्यानंतर मावळते डेव्हिड कॅमरून यांना आैपचारिक फेअरवेल देण्यात आला.
ब्रेक्झिटनंतर डेव्हिड कॅमरून यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांतच गृहमंत्री पदावरील थेरेसा यांच्याकडे ही जबाबदारी देण्याचा निर्णय कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीने घेतला. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्याशी त्यांची तुलना केली जात आहे. थेरेसा अत्यंत महत्वाकांक्षी स्वभावाच्या मानल्या जातात. राजकारणात प्रवेश करण्याच्या अगोदरपासून त्यांना देशाची पहिली महिला पंतप्रधान होण्याची इच्छा होती. परंतु हा मान मार्गारेट थॅचर यांनी पूर्वीच मिळाला आहे. ही माहिती मिळाली तेव्हा त्यांचा तिळपापड झाला होता, अशी आठवण खुद्द थेसर यांनीच एका रेडिआे मुलाखतीमध्ये सांगितले होते. मिर्टान शहराच्या मेयर म्हणून पहिल्यांदा त्या निवडून आल्या होत्या. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मेयर पदापासून सुरूवात झाली. १९५६ मध्ये जन्मलेल्या थेसर १९९७ मध्ये खासदार झाल्या. २०१० मध्ये देशाच्या गृहमंत्री पदाची सूत्रे त्यांची हाती आली. दरम्यान, लेबर पार्टीच्या अँगेला इगल यांचे नाव विरोधी पक्ष नेत्या म्हणून पुढे आले आहे. लवकरच त्याची आैपचारिकता पूर्ण होणार आहे.
प्रीती पटेलसह भारतीयांना संधी
थेसर यांची निवड झाल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळाच्या रचनेवर चर्वितचर्वण सुरू होते. त्यांच्या मंत्रिमंडळात महिलांचे प्राबल्य असेल, असे सांगितले जाते. त्यातही भारतीय वंशाच्या खासदारांना प्राधान्य दिले जाणार आहे. भारतीय वंशाच्या प्रीती पटेल यांच्यासारख्या खासदारांना ही संधी मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पटेल यांना लवकरच पदोन्नती मिळू शकते.
स्टँडिंग आेव्हेशन
मावळते पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांना बुधवारी संसद सभागृहात निरोप देण्यात आला. त्या वेळी आजी-माजी पंतप्रधान एकाच व्यासपीठावर आले होते. आपल्या अखेरच्या भाषणात ते म्हणाले, देशाचा व्यापार, सुरक्षेचा संबंध युरोपशी आहे. हे संबंध जोपसण्याचा सल्ला देतो.
रेसिपीची १०० पुस्तके
राजकारणात महत्त्वाकांक्षी असलेल्या थेरेसा यांना पाककलेची आवड आहे. त्यांच्याकडे रेसिपीची १०० पुस्तके आहेत. पूर्वीपासून त्यांनी गिर्यारोहणाचीही आवड जोपासली आहे.
मिस्टर फिलीप दूरच
फिलिप मे हे थेरेसा यांचे पती. परंतु प्रसिद्धीपासून खूप दूर. वेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आलेले फिलीप व बिनधास्त थेरेसा यांची पहिली भेट ऑक्सफर्डमध्ये पदवीच्या तिसऱ्या वर्षात झाली. नंतर ते विवाहबद्ध झाले. ते मितभाषी आहेत.
बातम्या आणखी आहेत...