आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळावर गोळीबाराच्या वृत्ताने काही काळ गोंधळ,लॉस एंजलिसमधील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लॉस एंजलिस- लॉसएंजलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोळीबाराच्या वृत्ताने सोमवारी काही काळ चांगलीच खळबळ उडाली. गडबडीत विमानतळाचा काही भाग रिकामा करण्यात आला. मात्र, गोळीबार झालाच नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. पोलिसांनी एका संशयिताला अटक केली. त्याने ‘द मास्क ऑफ झोरो’ या हॉलीवूड चित्रपटातील हीरोसारखा मास्क घातला होता.

पोलिसांचे प्रवक्ता अँडी नीमन यांनी ट्विरवर म्हटले आहे की, विमानतळावर मोठा आवाज येत होता. त्यालाच गोळीबार समजण्यात आले. गोळीबाराचे वृत्त समजताच मोठा गोंधळ उडाला. बॅगेज काउंटरजवळ आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकल्याचे काही लोकांनी सांगितले. नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासनाने विमानतळाचा काही भाग रिकामा केला. त्यानंतर काही टर्मिनल्स बंद करण्यात आले तसेच उड्डाणेही रोखण्यात आली. मात्र, या घटनेची चौकशी करण्यात आल्यानंतर गोळीबार झालाच नाही, मोठ्या आवाजालाच गोळीबार समजण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

लॉस एंजलिस हे शहर लोकसंख्येच्या दृष्टीने अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. तेथील विमानतळावर २४ तास मोठी वर्दळ असते. वाहतुकीच्या दृष्टीने विचार केल्यास ते जगातील सातव्या क्रमांकाचे विमानतळ आहे.

झोरोच्या वेशातील संशयिताला अटक
ट्विटरवर अपलोड करण्यात आलेल्या एका छायाचित्रात पोलिस एका संशयिताला अटक करत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्याने झोरोसारखा पोशाख घातला होता. त्याच्याजवळ प्लास्टिकची तलवारही होती.
बातम्या आणखी आहेत...