आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजोबांच्या जयंतीदिनी शक्तिप्रदर्शन; हुकूमशहाने लष्करी शस्त्रांसह लढाऊ विमानांचे केले प्रदर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्योगाँग- अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय दबावाला धुडकावून लावत उत्तर कोरियाने शनिवारी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. देशाच्या संस्थापकाच्या जयंतीनिमित्त लष्करी पथसंचलन करण्यात आले होते. त्यात क्षेपणास्त्रांसह इतर लष्करी शस्त्रांचे प्रदर्शन करण्यात आले. हुकूमशहा किम जाँग उन आजोबांच्या १०५ व्या जयंती प्रसंगी अतिशय आनंदी मुद्रेने वावरताना दिसून आले.  

सरकारी टीव्ही फुटेजमध्ये  काळा सूट व पांढरा शर्ट परिधान केलेले किम उन लष्करी मानवंदना स्वीकारताना दिसून आले. त्यानंतर ते रेड कार्पेटवरून गेले. संचलनात हजारो सैनिक सहभागी झाले होते. प्योगाँगमधील किम संग चौकात हा समारंभ पार पडला. किम द्वितीय संुग यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. आजोबांच्या स्मृतीमध्ये आयोजित समारंभात उन आनंदी मुद्रेत पाहायला मिळाले.  परेडमध्ये सैनिकांसह रणगाडे,क्षेपणास्त्रे, शस्त्रांसह रंगारंग देखावे, नृत्यसंगीतासह कलाकारांचाही यात समावेश होता. लढाऊ विमानांनी आकाशात १०५ हा अंक तयार केला. किम इल सुंग यांच्या १०५ व्या जयंती समारंभाचे प्रतिक म्हमून हा अंक तयार करण्यात आला होता. दरम्यान, उत्तर कोरिया अणुचाचणीची तयारी करत आहे. त्यावरून जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास ही उत्तर कोरियाची सहावी चाचणी ठरेल. अणुचाचणी किंवा रॉकेटची चाचणी घेण्याची शक्यता वर्तवली जाते. 
 
अमेरिका पाठवणार टॉमहॉक...
अमेरिकेने सिरियातून टॉमहॉक क्षेपणास्त्रे हटवण्यास सुरुवात केली आहे. ही क्षेपणास्त्रे आता उत्तर कोरियाच्या जवळ तैनात केली जाणार आहेत. अमेरिकेने सिरियाच्या हवाई तळावर टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता.

कधीही होऊ शकते युद्ध
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले, कोरिया प्रदेशात वाढत असलेल्या तणावावरून अमेरिका व उत्तर केरिया यांच्यात कधीही युद्ध होऊ शकते, अशी भीती चीनने व्यक्त केली आहे. युद्ध झाले तरी त्यात कोणीही विजयी होऊ शकणार नाही. चीन उत्तर कोरियाचा जवळचा सहकारी आहे. परंतु उत्तर कोरिया आता चीनचे म्हणणेही ऐकण्यास तयार नाही. त्यामुळे चीनने कोळशाची आयातदेखील बंद करून टाकली आहे. युद्ध झाल्यास परिस्थिती सावरणे कठीण होईल, असे यी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...