आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर कोरियाजवळून दोन विमानांचे झाले उड्डाण; अमेरिकेचे वागणे गँगस्टरसारखे : उत्तर कोरिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आशिया दौऱ्याच्या एक दिवस अगोदर कोरिया प्रदेशात अमेरिकेच्या बाॅम्बवर्षाव करणाऱ्या विमानांनी उड्डाण केले. अमेरिकेच्या बी-१ बी सुपरसॉनिक विमानांनी अमेरिकेच्या ग्वाम बेटावरील अँँडर्सन हवाई तळावरून उड्डाणे केली. ही लढाऊ विमाने दक्षिण कोरियाच्या आकाशातून उत्तर कोरियाच्या अतिशय जवळून गेली.  
 
दक्षिण कोरियाची एफ-१६ लढाऊ विमानेही त्यात समाविष्ट झाली होती. अमेरिकेच्या हवाई दलाने त्याला जपान व दक्षिण कोरियाच्या सैन्यासोबतचा लष्करी सरावाचा भाग असल्याचे म्हटले आहे. परंतु कोरियाच्या बेटावरील या लष्करी सरावाने उत्तर कोरिया व अमेरिकेतील तणाव आणखी वाढवला आहे. उत्तर कोरियाची वृत्तसंस्था केसीएनएने त्यास अमेरिकेची आण्विक चाचणी असे संबोधले आहे. अमेरिकेच्या निशाण्यावर उत्तर कोरिया आहे.
 
केसीएनएच्या म्हणण्यानुसार अमेरिकेची वागणूक एखाद्या गँगस्टरसारखी आहे. अमेरिकेचा कोरिया प्रदेशात तणाव वाढवण्याचा, अणुयुद्ध घडवण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या हवाई दलाच्या प्रवक्त्याने त्याचे खंडन केले आहे.
 
उत्तर कोरियावर कडक  कारवाईचा विचार  
उत्तर कोरियाला दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश म्हणून जाहीर करण्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एच.आर. मॅकमास्टर यांनी स्पष्ट केले आहे.  
 
बातम्या आणखी आहेत...