आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिषदेची बैठक होताच उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी; अयशस्वी राहिल्याचा अमेरिकेचा दावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 प्योगाँग/वॉशिंग्टन- आपल्या विरोधातील सुरक्षा परिषदेची बैठक होताच उत्तर कोरियाने शनिवारी देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची शनिवारी चाचणी केली. मात्र, उत्तर काेरियाचा  चाचणीचा प्रयत्न सलग चौथ्यांदा अयशस्वी झाल्याचा दावा अमेरिका व दक्षिण कोरियाने केला आहे.  

उत्तर कोरियाने केलेल्या चाचणीत क्षेपणास्त्र सीमेपलीकडे जाऊ शकले नाही. हे क्षेपणास्त्र मध्यम पल्ल्याचे होते. अमेरिकेने चाचणीवरून उत्तर कोरियाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे. उत्तर कोरियावर लष्करी कारवाई करण्याची धमकी दिल्याप्रकरणी रशिया व चीनने अमेरिकेवर टीका केली. नव्याने क्षेपणास्त्र चाचणी करून उत्तर कोरियाने चीनच्या इच्छेचा अनादर केला आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. शुक्रवारी ट्रम्प यांनी चीन व जिनपिंग यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. हुकूमशहा किम जाँग उन यांना क्षेपणास्त्र चाचणी करण्यापासून परावृत्त केल्याबद्दल ट्रम्प यांनी समाधान व्यक्त केले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही चाचणी करण्यात आली.  
-उत्तर कोरिया ऐकण्यास तयार नसेल तर त्याच्याविरोधातील सर्व पर्याय खुले आहेत.  
रेक्स टिलर्सन, परराष्ट्रमंत्री, सुरक्षा परिषदेतील भाषण.  
-उत्तर कोरियाला रोखण्याची जबाबदारी एकट्या चीनची नाही. अमेरिका वारंवार लष्करी कारवाईची धमकी देऊन उचकवण्याचा प्रयत्न करत आहे. हे निषेधार्ह आहे.  वांग यी, परराष्ट्रमंत्री, सुरक्षा परिषदेतील भाषण.  
 
 
 
बातम्या आणखी आहेत...