आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरखंडीय क्षेपणास्त्र नवीन वर्षात आणणार, उत्तर कोरियाच्या हुकूमशहाचा संकल्प, काम अंतिम टप्प्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल - नवीन वर्षात आंतरखंडीय क्षेपणास्त्र विकसित करण्याचा संकल्प उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांनी केला आहे. २०१६ चा अणू कार्यक्रम नवीन वर्षातही सुरूच राहील, असे उन यांनी स्पष्ट केले आहे.  

क्षेपणास्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचे अखेरचे परीक्षण झाल्यानंतर हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र देशाच्या शस्त्रागारात समाविष्ट होईल. नूतन वर्षाच्या निमित्ताने उन यांनी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला संबोधित केले. तीस मिनिटांच्या भाषणात उन यांनी देशाला संरक्षणदृष्ट्या अधिक सक्षम करण्यात येईल,असे सांगितले. गेल्या वर्षीदेखील देशाने क्षेपणास्त्र कार्यक्रम राबवला होता. अनेक चाचण्या घेण्यात आल्या होत्या.

यंदाही त्यात खंड पडणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. देशाला अाण्विकदृष्ट्या सक्षम राष्ट्र म्हणून उभे करण्याचा प्रयत्न आहे. हे क्षेपणास्त्र देशाच्या पूर्वेकडील भागात तैनात करण्यात येईल, जेणेकरून शत्रूचा अधिक प्रभावीपणे मुकाबला करणे शक्य होऊ शकेल, असे उन यांनी म्हटले आहे. वास्तविक उत्तर कोरियाने यापूर्वी आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. त्यात राष्ट्राला यश मिळाले नव्हते. त्यानंतरही देशाच्या क्षेपणास्त्र चाचण्या सुरूच आहेत, असे जाणकारांनी म्हटले आहे.  उन यांच्या कार्यपद्धती व धोरणांवर आंतरराष्ट्रीय समुदायाने अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही उन यांनी आपल्या कार्यशैलीत काहीही बदल केला नाही. उलट अनेकदा प्रगत राष्ट्राकडून धोका असल्याचा बहाणा करत अणु कार्यक्रम सुरूच ठेवला. 

२०११ पासून उन यांचा उद्दामपणा  
२०११ मध्ये किम जाँग यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर देशाची सूत्रे आपल्या हाती घेणारे उन यांनी आपला मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. आतापर्यंत उन यांच्या आदेशानुसार अनेक वेळा क्षेपणास्त्र किंवा अन्य प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जगभरातून उन यांच्या उद्दामपणावर नेहमी टीका केली जाते. उन यांनी अमेरिकेलादेखील धमकी दिली होती.  
बातम्या आणखी आहेत...