आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसमधील शेजाऱ्यामुळे कामावर होतो 10 टक्के चांगला-वाईट परिणाम, हॉर्वर्डचे संशोधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोस्टन- ऑफिसमध्ये आपण ज्याच्या शेजारी बसतो त्याचा आपल्या कामावर परिणाम होत असतो. हा परिणाम चांगला किंवा वाईट असू शकतो. या शेजाऱ्यामुळे आपली कामगिरी वाईट किंवा १० टक्क्यांपर्यंत चांगलीही होऊ शकते. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. 
 
अमेरिका आणि युरोपातील एका बड्या आयटी कंपनीतील दोन हजार कर्मचाऱ्यांवर दोन वर्षे अभ्यास करण्यात आला. या अभ्यासाचा अहवाल विद्यापीठाने आपल्या हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू या नियतकालिकात प्रसिद्ध केला आहे. यात म्हटले आहे की, आम्ही तीन निकषांवर हा अभ्यास केला - उत्पादनक्षमता (कमी वेळेत अधिक काम करण्याची क्षमता), प्रभावी काम (एखादे काम प्रभावीपणे करण्याची क्षमता) आणि दर्जा. एखाद्या कर्मचाऱ्यापासून तीन वेगवेगळ्या अंतरावर बसणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होतो हे पण अभ्यासण्यात आले.
 
 यात असे दिसून आले की, या कर्मचाऱ्याच्या शेजारी जो बसतो त्याच्यावरच सर्वाधिक परिणाम होतो. २५ फूट दूर बसणाऱ्या कर्मचाऱ्यावर याचा फार कमी परिणाम होतो. तर ५० फुटांवर बसलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यावर याचा काहीच परिणाम होत नाही. एखादा साधारण क्षमतेचा कर्मचारी  त्याच्यापेक्षा दुप्पट क्षमता असलेल्या कर्मचाऱ्याजवळ बसवला तर साधारण काम करणाराही १० टक्के अधिक चांगले काम करतो.
 
 यात कर्मचाऱ्यांना तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आले. प्रॉडक्टिव्ह वर्कर्स (कमी वेळेत अधिक काम, मात्र दर्जा नसतो), दर्जेदार (मात्र अधिक वेळ घेतात) व साधारण (दोन्ही प्रकारात सरासरी काम). यात प्रॉडक्टिव्ह आणि दर्जेदार काम करणाऱ्यांना सोबत बसवले तेव्हा दोघांचीही क्षमता वाढल्याचे दिसून आले. सरासरी काम करणारा सोबत बसवला तेव्हा काहीच बदल दिसून आला नाही.
 
कुरापतखोर सोबत बसले तर एकाची नोकरी जाण्याचा सर्वाधिक धोका
ज्या कर्मचाऱ्यांची वागणूक चांगली नाही, जे घोटाळे करतात, इतरांचा छळ करतात त्या कर्मचाऱ्यांचा त्यांच्या शेजारी बसणाऱ्यांवर नकारात्मक परिणाम होतो. असे  दोन कुरापतखोर कर्मचारी कार्यालयात सोबत बसत असतील तर एकाची नोकरी जाण्याची शक्यता २७ टक्के अधिक असते.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...