आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसच्या ताब्यातून सुटकेसाठी वारंवार प्रयत्न, शरिया कोर्टाने पाय कापण्याची शिक्षा सुनावली, तरीही पळून जाणारच असे सुनावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्युनिच - लामिया आजी बशर. केवळ १८ वर्षीय मुलगी. इसिसच्या अमानुष अत्याचारांचा विरोध करून तिने धैर्याने सुटका करवून घेतली. ती २० महिने दहशतवाद्यांच्या ताब्यात राहिली. अनेकदा तिला विकले गेले. बलात्कार झाले. सामूहिक बलात्कारांना तिने तोंड दिले. अखेरीस सुटका करवून घेण्यात तिला यश आले. आता जर्मनीतील सिरिया आणि इराकी निर्वासितांसाठी काम करत आहे. तिला आणि तिची बहीण नादिया मुराद यांना युरोपियन युनियनच्या प्रतिष्ठित सखारोव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

इराकमधील कोचो या गावातील ती रहिवासी होती. यजदीवंशीय लामिया आणि तिची बहीण नादिया ऑगस्ट २०१४ मध्ये इसिसच्या दहशतवाद्यांच्या तावडीत सापडल्या. दोन वर्षे अथक प्रयत्न केल्यानंतर त्यांना सुटका करवून घेण्यात यश आले. त्यांनी दहशतवाद्यांच्या अत्याचारांची वास्तविकता नुकतीच सांगितली. दहशतवाद्यांनी माझे वडील आणि भावांसह सर्व कुटुंबीयांना ठार केले. मला व माझ्या बहिणीला फक्त जिवंत ठेवले आणि ताब्यात घेतले. अनेक यजदी तरुणींसह आम्हाला सेक्स स्लेव्ह म्हणून कैदेत ठेवले. एकदा तर ४० दहशतवाद्यांनी पाशवी बलात्कार केला. दोन वर्षांच्या अवधीत मला अनेकदा विकले गेले. अनेकदा मारहाण केली. आत्मघातकी हल्लेखोर होण्यासाठी आमच्यावर दबाव टाकला गेला. दहशतवाद्यांच्या तावडीतून निसटण्यासाठी अनेकदा पलायन केले. मात्र, यश आले नाही. पुन्हा ताब्यात घेतल्यानंतर मारहाण केली. त्या पाशवी अत्याचारांमुळे माझा चेहरा खराब झाला. एकदा पलायनाचा प्रयत्न केल्यानंतर मला इस्लामिक स्टेटच्या शरिया न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायमूर्तीने सांगितले की, मला ठार केले जावे किंवा तिचे पाय कापून टाका. तेव्हा मी उत्तर दिले की, माझा एक पाय कापलात तर मी दुसऱ्या पायाने पळून जाईल. त्यानंतर मला दुसऱ्या मालकाकडे विकले गेले. अखेरीस वर्ष २०१६ मध्ये मला माझ्या बहिणीसह पलायन करण्यात यश आले. त्या वेळी बहिणीचा पाय सुरुंगावर पडला. त्यात आम्ही जखमी झालो. मात्र, आम्ही मोठ्या प्रयासाने सैन्याच्या ताब्यातील प्रदेशात येण्यात यशस्वी झालो. सैन्याने आम्हाला सुरक्षितस्थळी पोहोचवले. त्यानंतर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने आम्ही जर्मनीमध्ये पोहोचलो.  
 
आता सिरियातील निर्वासितांना युरोपात शरण देण्यासाठी कार्यरत  
लामिया आणि तिची बहीण नादिया मुराद सध्या जर्मनीत आहेत. त्या इसिसच्या दहशतीने पीडित लाखो लोकांना, विशेषत: महिलांना मदत करत आहेत. विविध देशांच्या अधिकाऱ्यांना भेटून त्या पीडितांना युरोपमध्ये शरण देण्याची शिफारस करत आहेत. शिवाय त्यांना कायदेशीर मदत देणेही सुरू आहे.