आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुटलेल्या बोटावरून हल्लेखोराची ओळख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री दहशतवादी हल्ला करणाऱ्या सातपैकी एका हल्लेखोराची पोलिसांना ओळख पटली आहे. कॉन्सर्ट हॉलमध्ये कापलेल्या बोटातून अतिरेक्याचा सहभाग उघड झाला. त्याचे नाव उमर इस्माईल मुस्तेफई (२९) असल्याचे सांगण्यात येते.

पॅरिसच्या उपनगरात जन्मलेला मुस्तेफई गरिबीत राहत होता,असे सांगण्यात येते. त्याला चार भाऊ आणि दोन बहिणी आहेत. तो छोट्या-मोठ्या आठ गुन्ह्यांत दोषी ठरला होता. मात्र, त्यास तुरुंगवासाची शिक्षा झाली नव्हती. कॉन्सर्ट हॉलमध्ये मिळालेले बोट पोलिसांच्या रिकॉर्डशी मिळतेजुळते आहे. पॅरिस उपनगराजवळ एक बेवारस कारमधून पोलिसांनी एके ४७ रायफल जप्त केली आहे. दहशतवादी हल्ल्यात वापरलेल्या शस्त्राशी ती मिळतीजुळती आहे. या अतिरेकी हल्ल्यात १२९ पेक्षा जास्त लोक मारले गेले. एका हल्लेखोराच्या मृतदेहाजवळ सिरियाचा पासपोर्ट आढळला होता. त्यामुळे सिरियातून आलेल्या निर्वासितांमध्ये आयएसचे अतिरेकी सामील होऊ शकतात, अशी शक्यता आहे. ग्रीसचे गृहमंत्री निकोस तोसकाम यांनीही सिरियन पासपोर्टधारक लेरोस बेटावरून ३ ऑक्टोबर रोजी निघाल्याचा दुजोरा दिला. युरोपीय संघाच्या नियमानुसार तो नोंदणीकृत निर्वासित होता.