आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडनी कसोटी : रेनशॉचे द्विशतक हुकले; हँड्सकोंबचे शतक, ऑस्ट्रेलियाच्या ८ बाद ५३८ धावा; पाकिस्तान २ बाद १२६

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- वीसवर्षीय मॅट रेनशॉच्या १८४ आणि २५ वर्षीय पीटर हँड्सकोंबच्या ११० धावांच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ५३८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानने २ बाद १२६ धावा काढल्या. दिवसाचा खेळ संपला त्या वेळी युनिस खान ६४ आणि अझहर अली ५८ धावांवर खेळत होते.
   
जोश हेझलवूडने पाकिस्तानचे दोन गडी अवघ्या ६ धावांच्या आत पॅव्हेलियनमध्ये परतवले. त्याने शार्जिल खान (४) आणि बाबर आझम (०) यांना चार चेंडूंच्या अंतरात बाद केले. यानंतर अझहर आणि युनिस खान यांनी तिसऱ्या विकेटसाठी अभेद्य १२० धावांची भागीदारी केली. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने दिवसाची सुरुवात ३ बाद ३६५ धावांवरून केली. त्या वेळी रेनशॉ १६७ आणि हँड्सकोंब ४० धावांवर खेळत होते. यानंतर दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी १४२ धावांची भागीदारी केली. रेनशॉॅने २९३ चेंडूंचा सामना करताना २० चौकारांसह १८४ धावा ठोकल्या. रेनशॉला इम्रान खानने बाद केले.  रेनशॉने मंगळवारी आपल्या स्कोअरमध्ये १७ धावाच जोडल्या. दुसऱ्या टोकावरून हँड्सकोंबने पाकिस्तानविरुद्ध आपले दुसरे कसोटी शतक झळकावले. त्याने २०५ चेंडूंत ९ चौकारांसह ११० धावांची खेळी केली. हँड्सकोंबची ही चौथी कसोटी असून यात त्याने २ शतके ठोकली आहेत. हँड्सकोंबसोबत हिल्टन कार्टराइटने ९५ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने ३७ धावा काढून ९१ धावांची भागीदारी केली.
 
 
बातम्या आणखी आहेत...