आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेआयटीकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्या मुलाची अडीच तास चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद  - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा मुलगा हुसैन नवाझ यांची पनामा गेट प्रकरणात संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) रविवारी अडीच तास चौकशी केली. हुसैन यांनी जेआयटीच्या दोन सदस्यांबद्दल आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाने सोमवारी ही याचिका खारीज केली. चौकशीदरम्यान जेआयटीने हुसैन यांच्या वकिलाला बाहेर काढले होते.  
 
सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हुसैन यांची याचिका खारीज करताना म्हटले की, दोन्ही सदस्य ‘पांढरपेशांचे गुन्हे उघडकीस आणण्यात तज्ज्ञ आहेत.’ आपल्याविरोधात तपास करणाऱ्या जेआयटीतील ६ सदस्यांपैकी २ सदस्यांवर आक्षेप आहे. त्यापैकी एक बिलाल रसूल हे पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाशी (पीटीआय) जवळीक असणाऱ्याचा भाचे आहेत, तर दुसरे सदस्य अमर अजीज यांना परवेझ मुशर्रफ यांनी एका चौकशीसाठी नियुक्त केले होते, असे हुसैन यांनी याचिकेत नमूद केले होते. ‘पीटीआय’चे इम्रान खान सध्या नवाझ शरीफ यांना सत्तेतून हटवण्याच्या प्रयत्नात आहेत, तर मुशर्रफ यांनी १९९९ मध्ये नवाझ शरीफ यांना हटवून सत्तेवर कब्जा केला होता.  
 
दरम्यान, हुसैन हे रविवारी जेआयटीसमोर हजर झाले. ते म्हणाले की, ‘सर्वोच्च न्यायालयाने जेआयटीच्या कामाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे आपण जेआयटीसमोर हजर होत आहोत.’ पनामा पेपर्स लीक प्रकरणात नवाझ शरीफ यांच्या कुटुंबीयांच्या चौकशीसाठी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जेआयटी स्थापन करण्यात आली आहे, पण न्यायालयाने नवाझ शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी अपात्र ठरवण्यास नकार दिला होता.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...