आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स : राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार ली पेनविरोधात निदर्शने, 6 पोलिस भाजले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस -  राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि उजव्या विचारसरणीच्या नेत्या मेरिन ली पेन यांच्याविरुद्धच्या निदर्शनांचे हिंसेत पर्यवसान झाले. या हिंसेत ६ पोलिस कर्मचारी भाजले गेले. पैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी निदर्शकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे निदर्शकांनी पोलिसांवर अग्निबॉम्ब टाकले. यात ६ पोलिस कर्मचारी भाजले. ५ लोकांना याप्रकरणी अटक झाली आहे. निदर्शकांनी ‘फॅसिस्टवाद्यांनो परत जा’ अशी घोषणाबाजी केली. ली पेन जर राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्या तर युरोपीय युनियनची एकजूट संपुष्टात येईल असे त्यांचे म्हणणे आहे. लाखो लोक बेरोजगार होतील. फ्रान्समध्ये ७ मे रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची दुसरी फेरी होईल. ली पेन यांची स्पर्धा मॅक्रोशी आहे. यात जी व्यक्ती विजयी ठरेल ती राष्ट्राध्यक्षपदी निवडली जाईल.  
 
देशभरात ९ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात  
ली पेन यांच्या प्रचारसभेत जाऊन लोक विरोध दर्शवत आहेत. ली पेन यांनी वचन दिले आहे की, त्या राष्ट्राध्यक्ष झाल्या तर फ्रान्सला युरोपीय युनियनमधून बाहेर पडण्यासाठी जनमत चाचणी घेतील. याविरुद्ध देशभरात निदर्शने सुरू आहेत. ९ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...