आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त तेलामुळे महागाई नियंत्रणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असणे हे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. यामुळे महागाई नियंत्रणात ठेवणे शक्य झाले असल्याचेही ते म्हणाले. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी जेटली सध्या यूएईच्या दोनदिवसीय दौऱ्यावर आहेत.
निर्णयप्रक्रियेतील तेजी, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक वाढवणे आणि इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत गतिमान विकासदरामुळे भारतात गुंतवणुकीचे वातावरण आधीपेक्षा चांगले असल्याचेही जेटली म्हणाले. स्वस्त कच्च्या तेलामुळे उत्पादक देशांना उपभोक्ता देशांकडून पैसा हस्तांतरण शक्य झाले आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असल्याचे त्यांनी सांगितले.