आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलिपाइन्स बस अपघातात मृतांची संख्या15 वर, बसमधील 62जण गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तनाय  - फिलिपाइन्समधील बस अपघातातील मृतांची संख्या वाढून १५ वर पोहोचली आहे, अशी माहिती आज मंगळवारी सूत्रांनी देताना म्हटले आहे की, बसमधील इतर ५० जणांनाही दुखापती झाल्या असून ते सर्व गंभीर अवस्थेत आहेत. यातील बहुतांश मृत आणि जखमी हे महाविद्यालयीन विद्यार्थीच असून ते सोमवारी कॅम्पीगच्या सहलीवर होते. मृतांमध्ये बसचालकांसह एका प्राध्यापकाचाही समावेश आहे.  

हा अपघात झाला तेव्हा त्यांनी ठरविलेल्या या भाड्याच्या बसचे ब्रेक निकामी होऊन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बस डोंगराच्या तीव्र उतारावरून घसरत जाऊन रस्त्याच्या बाजूने खाली इलेक्ट्रिकच्या खांबावर आदळून खोलवर कोसळून चेपली गेली, अशी माहिती या अपघाताचे बचाव कार्य हाताळणारे मनिलाच्या पूर्वेकडील तनाय शहरातील रिझाल प्रांताचे आपत्कालीन प्रतिसाद अधिकारी बर्लिटो बाटी ज्यू. यांनी दिली आहे.
 
 ते पुढे म्हणाले की, ताज्या माहितीनुसार बसमध्ये ६२ जण प्रवास करत होते. मात्र ५८ जणांचीच नोंद आहे. ते म्हणाले, या अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की, या अपघातात चेपल्या गेलेल्या बसचे छप्परच उडाले आहे. अपघातस्थळी खेळण्या, बुटा, चपलांचा खच पडलेला आढळला रबर जळाल्यासारखा दुर्गंध येत होता. 
 
बातम्या आणखी आहेत...