आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प नऊ पॉइंटने मागे, ‘करा वा मरा’ची स्थिती, लास वेगासमध्ये आज अंतिम वादविवाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लास वेगास - अमेरिकेतील राष्ट्रपतिपदाच्या प्रमुख उमेदवारांमध्ये तिसऱ्या आणि अंतिम वादविवादात रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ‘करा वा मरा’ची स्थिती आहे.
प्रसारमाध्यमाच्या सर्वेक्षणानुसार डेमोक्रेट पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा ट्रम्प हे नऊ पॉइंटने मागे आहेत. शेवटचा वादविवाद लास वेगासमध्ये पहाटे साडेसहा वाजता सुरू होईल.
अमेरिकेत राष्ट्रपतिपदासाठी पहिला वादविवाद सप्टेंबर १९६० मध्ये डेमोक्रेट सिनेटर जॉन एफ केनेडी आणि रिपब्लिकनचे उपराष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांच्यात शिकागोमध्ये झाला होता.
टीव्हीवर झालेल्या या वादविवादात निक्सन यांनी फिकट रंगाचा सूट घातल्याबद्दल त्यांची खिल्ली उडवण्यात आली होती. २०१२ मध्ये मिट रोम्नी यांनी जोरदार सुरुवात केली होती. तेव्हा ओबामा यांनी ‘मी येथे आहे आणि आपले विचार मांडणार आहे,’ असे शब्द वापरले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या वादविवादात ओबामा यशस्वी वक्त्याच्या रूपात समोर आले होते. ८ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत जर हिलरी यांचा विजय झाला तर अमेरिकेच्या २२७ वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासात राष्ट्रपती बनणाऱ्या त्या पहिला महिला ठरणार आहेत. ट्रम्प जिंकले तर रिअल इस्टेटमधील राष्ट्रपती बनणारे ते पहिले व्यावसायिक ठरतील. वादविवादात कर्ज आणि पात्रता, इमिग्रेशन, अर्थव्यवस्था, सुप्रीम कोर्ट, विदेशी ज्वलंत मुद्दे आणि राष्ट्रपती बनण्यासाठी फिटनेस या मुद्द्यांवर चर्चा होईल.

प्रमुख आरोप
क्लिंटन या निवडणुकीत गडबड करू शकतात, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला. त्यांनी तरुणांना मतदान केंद्रांवर सर्तक राहण्याचे आवाहन केले. हिलरी यांना सत्तेतील पक्ष, राष्ट्रपतींचे समर्थन आहे. ट्रम्प यांना स्वपक्षातून विरोध होत आहे.
बातम्या आणखी आहेत...