आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रशियाचा कथित हस्तक्षेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन  - अमेरिकेच्या संसदेतील खासदारांनी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला आहे. २०१६ मध्ये झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रशियाचा कथित हस्तक्षेप तसेच वर्तणूक चांगली नसल्याचा आरोप करत कॅलिफोर्नियाचे डेमोक्रॅटिक खासदार ब्रॅड शेरमन यांनी हा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला टेक्सासचे खासदार अल ग्रीन यांनी पाठिंबा दर्शवला आहे.  
 
शेरमन म्हणाले की, ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान रशियाकडून मदत घेतली होती. ट्रम्प यांच्या मुलाने केलेल्या खुलाशानुसार ते प्रचारात रशियाची मदत घेण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट होते. शिवाय, ट्रम्प यांनी राष्ट्रपतींचे सुरक्षा सल्लागार मायकल फ्लिप यांची तसेच रशियासोबतच्या संबंधाच्या चौकशीतही अडथळा निर्माण केला, असा आरोपही शेरमन यांनी केला. दरम्यान, महाभियोगाचा हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. कारण, संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असून डेमोक्रॅटिकपेक्षा त्यांच्याकडे ४६ मते जास्त आहेत. राष्ट्रपतिपदावर विराजमान झाल्यानंतर प्रथमच ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आला आहे.
बातम्या आणखी आहेत...