आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असांजला इक्वेडोरकडून अभय, राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरिनो यांची भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किटो - निवडणूक प्रचार मोहिमेत विरोधी वक्तव्य करणारे इक्वेडोरचे नूतन राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरिनो यांनी  विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांना जाहीर अभय देऊन टाकले आहे. ते राजदूत कार्यालयात आश्रयाला राहू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले असले तरी असांज हॅकर असल्याची टीका त्यांनी केली.  
 
मोरिनो यांनी याच महिन्यांत पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. गत सरकारने असांजला आश्रय देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काहीही बदल होणार नाही. परंतु मिस्टर असांज हे हॅकर आहेत. ही गोष्ट आम्ही नाकारू शकत नाहीत, अशा कठोर शब्दांत मोरिनो यांनी आपली भूमिका मांडली. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारमोहिमेतदेखील मोरिनो यांनी असांजने इक्वाडोरच्या राजकारणात ढवळाढवळ करू नये, असा  इशारा दिला होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या मोरिनो यांनी नाईलाजास्तव मागील सरकारच्या निर्णयाची री आेढली. मात्र कठोर भूमिका कायम ठेवली. ब्रिटनचे सरकार असांजला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. असांजसाठी सुरक्षित मार्ग प्रशस्त होण्याची चिन्हे दिसत नाहीत. म्हणूनच असांजला इक्वाडोरच्या राजदूत कार्यालयात राहावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...