आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर मोसूल फत्ते; इसिसचा उद्ध्वस्त शहरातून खात्मा, लष्करी कारवाईला यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी रविवारी मोसूल गाठले हाेते. - Divya Marathi
पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी रविवारी मोसूल गाठले हाेते.
मोसूल  - गेल्या नऊ महिन्यांपासून इस्लामिक स्टेटशी इराकी सैन्याचा सुरू असलेल्या संघर्ष संपला. इराकी सैन्याने इसिसच्या दहशतवाद्यांचा खात्मा करून ही मोहिम फत्ते करून दाखवली. रविवारी इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी इसिसवरील विजयाची घोषणा करण्यासाठी सैन्याच्या पोषाखात मोसूलमध्ये दाखल झाले होते. त्यांनी सैन्याचे अभिनंदन केले.  
  मोसूलमध्ये तिगरीस नदी वाहते. रविवारी सैन्याने जुन्या शहरातील नदीपात्रापर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला होता. नदीपात्र शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दहशतवाद्यांनी मानवी ढालीचा वापर करून दहशतवादी तेथे दडून बसले होते. 
 
जीवित हानीच्या भीतीने लष्कराने तातडीने कारवाई न करता अत्यंत चलाखीने दहशतवाद्यांना मात देत शहराचा एक-एक भागावर ताबा मिळवला. गेल्या आठवड्यात जुन्या शहरातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आल्याने यश टप्प्यात आले आहे. आता दहशतवाद्यांचा अतिशय कमी क्षेत्रावर कब्जा आहे. दहशतवादी सातत्याने मानवी ढालीचा वापर करून संघर्षाचा कालावधी वाढवत नेत होते. अमेरिकेच्या हवाई दलासदेखील हा संघर्ष कठीण गेला होता. 
 
२०१४ मध्ये नायनाट  
इराकमध्ये इसिसच्या विरोधातील लष्करी मोहिमेने उत्तर व मध्यकडील प्रदेशात चांगले यश मिळवले होते. या प्रदेशांत इसिसचा नायनाट करण्यात आला होता. त्यानंतर इसिसने मोसूलवर ताबा मिळवत नागरिकांना वेठीस धरले. त्याच वेळी संघटनेचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी याने अल-नुरी मशिदीत हजेरी लावली होती. सार्वजनिक ठिकाणी येण्याची बगदादीची ही पहिलीच वेळ होती. गेल्या महिन्यात ही मशीद उद्ध्वस्त झाली होती.   
 
ऑक्टोबरमध्ये मोहिमेला सुरुवात  
मोसूलला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्याची लष्करी मोहीम गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू झाली होती. मोसूल इराकमधील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. हे शहर जुने असल्यामुळे येथील नगररचना अरुंद रस्त्यांची आहे. दाट लोकवस्तीमुळे सैन्यापुढे दहशतवाद्यांच्या खात्म्याचे आव्हान होते. परंतु आता ते टप्प्यात आले आहे.  

शहर झाले बकाल  
दुसऱ्या क्रमांकाचे शहर युद्धाने बकाल करुन टाकले आहे. सुमारे ३२ हजारावर घरांचे नुकसान आणि पडझड झाली आहे. ही घरे राहण्यायोग्य राहिली नाहीत. ते वसवणे कठीण आहे.     
 
१० लाखावर स्थलांतरित   
गेल्या ८ महिन्यांपासून मोसूलचा संघर्ष सुरू आहे. तो अंतिम टप्प्यात आला आहे. या काळात शहर गोळीबार, बॉम्बस्फोट यामुळे उद्ध्वस्त झाले. संघर्षाने हजारो निष्पाप लोकांचे बळी घेतले. सुमारे १० लाख लोकांना घरेदारे सोडावी लागली होती. 
बातम्या आणखी आहेत...