आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Prime Minister Narendra Modi's Airland Tour, Divya Marathi

आयर्लंडशी व्यापारवृद्धीवर भर, द्विपक्षीय संबंधांना बळकटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डब्लिन- पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी युरोपातील छोटा देश असलेल्या आयर्लंडमध्ये दाखल झाले. उभय देशांच्या पंतप्रधानांमध्ये झालेल्या चर्चेत व्यापारवृद्धीवर सहमती झाली. त्याअगोदर दोन्ही देशांतील व्यापारासह द्विपक्षीय संबंधाला बळकटी मिळेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. ६० वर्षांत आयर्लंडला भेट देणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरले आहेत.

आयर्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. डब्लिन शहरात मोदी यांच्या स्वागतासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आयर्लंडसोबत आगामी वर्षांत मोठ्या पातळीवर आर्थिक सहकार्य करण्याची अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून असलेल्या द्विपक्षीय संबंधांना उजाळा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मोदी यांनी स्पष्ट केले. दोन्ही देशांत व्यापारी पातळीवर २.४८ अब्ज युरोची उलाढाल केली होते. आयर्लंडमधून भारतात कॉम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, फार्मास्युटिकल्स, केमिकल्स, अन्न आणि यंत्रांची निर्यात केली जाते. भारतातून आयर्लंडमध्ये वस्त्रोद्योग, फार्मास्युटिकल्स इत्यादी उत्पादनांची निर्यात होते. दरम्यान, १९५६ मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आयर्लंडला भेट दिली होती.

भारतीयांची चलती
वोक्हार्ट, सन फार्मा, रिलायन्स, जिनिमेडिक्स यासह फर्स्टसोर्स, टाटा कन्सल्टन्सी, एचसीएल, विप्रो या माहिती तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपन्या येथे आहेत. आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय लोक मोठ्या प्रमाणात दिसतात. डॉक्टर, नर्सेस, अभियंत्यांचा त्यात समावेश आहे.

व्हिसा धोरणात अपेक्षित बदल व्हावा
आयर्लंडने आपल्या व्हिसा धोरणात बदल केला पाहिजे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कंपन्यासाठी अनुकूल अशा प्रकारचे धोरण देशाने स्वीकारायला हवे. जेणेकरून भारतीय व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊ शकेल. तसे बदल सरकारने करावेत.
सुरक्षा परिषदेत पाठिंबा द्यावा
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी आयर्लंडला केले. आण्विक पुरवठादार गटात (एनएसजी) देखील भारताला स्थान मिळावे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समर्थनाची गरज आहे. आयर्लंडचा पाठिंबा मिळाल्यास त्यामुळे द्विपक्षीय संबंध बळकट होऊ शकतील.