आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटाबंदीची प्रक्रिया जवळपास पूर्ण : अर्थमंत्री अरुण जेटली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- नोटाबंदीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. मोठ्या नोटा बंद करून त्या जागी नवीन चलन व्यवहारात आणण्याची इतकी सहज प्रक्रिया जगभरात कुठेही झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. “लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.  पुढील काळात जीडीपीचा कर वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
चलनाधारित अर्थव्यवस्थेसाठी देण्यात येणारे सर्व तर्क आता जुने झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशात एक “नवीन सामान्य’ पातळी बनवण्यासाठी ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
देशातील नगदीवर आधारित अर्थव्यवस्थेला डिजिटल अर्थव्यवस्था बनवण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय असल्याचेही ते म्हणाले. यामुळे बँकिंग प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणात निधी पोहोचला असून महसुलातही वाढ झाली आहे. यामुळे अवैध अर्थव्यवस्था वैध करण्यासाठीही मदत मिळेल. शेवटी आर्थिक विकास तेजीने होण्यास मदत मिळेल.
बातम्या आणखी आहेत...