आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचा मोझांबिकशी डाळ खरेदीचा करार, तीन प्रमुख करारांवर शिक्कामोर्तब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्यूसी. - Divya Marathi
पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी आणि मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्यूसी.
मापुतो (मोझांबिक) - भारतातील डाळीचे संकट आता कदाचित लवकरच संपेल. भारताने मोझांबिक या आफ्रिकन देशासोबत प्रदीर्घ काळापर्यंत डाळ खरेदी करण्याचा करार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मोझांबिक दौऱ्यात गुरुवारी तीन करार करण्यात आले. त्यापैकी हा एक करार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी मोझांबिकचे अध्यक्ष फिलिप न्यूसी यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यानंतर उभय नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. दहशतवाद हा जगाला असलेला सर्वात मोठा धोका आहे, असे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले. मोदी चार आफ्रिकन देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोझांबिकची राजधानी मापुतो येथे पोहोचले. मोदी शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेला जातील. जोहान्सबर्गमध्ये त्यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात आली आहे. त्यानंतर ते टांझानिया आणि केनियाला जातील.

तीन प्रमुख करार
> भारत मोझांबिककडून प्रदीर्घ काळ डाळ खरेदी करणार
> युवक आणि क्रीडा या क्षेत्रात सहकार्य.
> अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यात सहकार्य.
भारत ही मदत देणार
> मोझांबिकच्या सुरक्षा दलांना मजबूत करण्यासाठी.
> एड्स आणि इतर आजारांची औषधे देणार.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...