आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडोनेशियात बलात्कार करणा-यांना नपुंसक बनवणार, महिलांचे हार्मोन्सही शरीरात टाकणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडोनेशियात रोज बलात्काराची 35 प्रकरणे दाखल होतात. 90 टक्के अशा प्रकरणांत गुन्हेच दाखल होत नाहीत. - Divya Marathi
इंडोनेशियात रोज बलात्काराची 35 प्रकरणे दाखल होतात. 90 टक्के अशा प्रकरणांत गुन्हेच दाखल होत नाहीत.
जकार्ता - पाच महिन्यांपूर्वी झालेल्या एका बलात्काराच्या प्रकरणानंतर इंडोनेशियाने मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदा करण्याचे ठरवले आहे. नव्या कायद्यात दोषींना नपुंसक करण्यापासून मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल. किमान शिक्षा १० वर्षे असेल.

१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत निर्भया हत्याकांड झाले होते. अगदी तशीच घटना इंडोनेशियात गेल्या मे महिन्यात घडली. एका १४ वर्षीय मुलीवर १२ जणांनी अत्याचार करून तिची हत्या केली. देशभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर राष्ट्रपती जोको विडोडो यांनी कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले. नंतर संसदेत मसुदा सादर करण्यात आला. चर्चेअंती दोन पक्षांनी या कायद्याविरुद्ध मतदान केले. तरी, बहुमताने कायदा मंजूर झाला. यानुसार, लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्यांना नपुंसक केले जाईल. त्यांच्या शरीरात महिलांचे हार्मोन्स सोडले जातील.
त्यांची नावे जाहीर केली जातील. शिवाय त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी शरीरात इलेक्ट्रॉनिक्स चिप लावली जाईल. शिक्षा संपली तरी चिप कायम राहील. गंभीर प्रकरणांत मृत्युदंडही होईल. दरम्यान, इंडोनेशियाच्या महिला आयोगाने तसेच डॉक्टरांनी कायद्याला विरोध केला. हा प्रकार व्यावसायिक तत्त्वांच्या विरोधात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दोषींना अशी शिक्षा पोलंड, द. कोरिया, रशियासह काही अमेरिकी राज्यांत आहे. सौदी अरबमध्ये तर मृत्युदंडही दिला जातो.

सर्वेक्षणानुसार...

{इंडोनेशियात रोज बलात्काराची ३५ प्रकरणे दाखल होतात.
{९० टक्के अशा प्रकरणांत गुन्हेच दाखल होत नाहीत.
{अत्याचार करणाऱ्यांपैकी ६५ टक्के तरुणांचे वय १८ पेक्षा कमी होते.
{२०१५ मध्ये ३५,६५१ प्रकरणे दाखल. म्हणजे रोज ९८ प्रकरणे.
{९५ टक्के महिलांवर अत्याचार करणारे लोक म्हणजे त्यांच्या परिचयातील तरुण आहेत.
{१७ हजार पीडित तरुणींचे वय १८ ते ३० वर्षांदरम्यान आहे.
बातम्या आणखी आहेत...