आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या राजपदाचा नीलम सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या ब्रिटनच्या राजपदी दीर्घ काळ असणाऱ्या पहिल्या राज्यकर्त्या ठरल्या आहेत. महाराणींनी आपल्या या पदाची पासष्टी गाठली आहे. त्यांच्यापूर्वी इतकी वर्षे कोणीही हे सर्वोच्च पद भूषवले नाही. ९० वर्षीय सम्राज्ञी एलिझाबेथ द्वितीय यांच्या खासगी निवासस्थानामध्ये यानिमित्त धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले.  एलिझाबेथ यांचे वडील जॉर्ज व्ही. यांचा हा स्मृती दिवसही आहे. महाराणींचे राज्यारोहण आणि वडिलांचा स्मृतिदिन यांची तारीख एकच असल्याने त्यांनी आपल्या सँड्रिंगहॅम येथील निवासस्थानी खासगी कार्यक्रमाचे आयोजन केले.  
 
नीलम दागिन्यांतील महाराणींचे छायाचित्र प्रकाशित 
बकिंगहॅम पॅलेसने यानिमित्त महाराणींचे छायाचित्र पुनर्प्रकाशित केले आहे. ब्रिटनमध्ये पासष्टी साजरी करण्याच्या विधीला नीलम महोत्सवी वर्ष संबोधले जाते. नीलमचे दागिने घातलेले एलिझाबेथ द्वितीय यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. हे छायाचित्र प्रसिद्ध छायाचित्रकार डेव्हिड बेली यांनी २०१४ मध्ये घेतले होते. जगात ब्रिटनचा प्रचार करण्याच्या अभियानादरम्यान हे छायाचित्र घेण्यात आले होते. किंग जॉर्ज (सहावे) यांनी १९४७ मध्ये विवाहानिमित्त महाराणींना नीलम सूट भेट स्वरूपात दिला होता.  
 
महाराणी दयाळू आणि मिश्कीलही
एलिझाबेथ द्वितीय यांचा स्वभाव दयाळू असून त्या मिश्कीलही आहेत, असे छायाचित्रकार डेव्हिड बेली यांनी सांगितले. आपण त्यांच्या स्वभावाचे चाहते आहोत. त्या कणखर महिला आहेत. ६ फेब्रुवारी १९५२ रोजी त्यांचे वडील सँड्रिंगहॅम पॅलेसमध्ये मरण पावले होते. त्या वेळी २५ वर्षीय एलिझाबेथ राजकन्या होत्या. तेव्हांपासून त्यांचा स्मृतिदिवस खासगी महालात साजरा होतो. वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त ४१ फैरींची आणि ६२ तोफांची सलामी देण्यात आली.
 
एलिझाबेथ द्वितीय यांच्या राजपदावरील ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त नीलम महोत्सवी नाणे जारी करण्यात आले.५ पौंड किमतीचे तिकिट यानिमित्त प्रकाशित करण्यात येईल. तिकिटाचा रंग नीलमप्रमाणे आकाशी आहे. प्लॅटिनम ज्युबिलीकडे बकिंगहॅमचे डोळे लागले आहेत. सत्तरीचा महोत्सव भाग्याचा दिवस असेल, असे सूत्रांनी सांगितले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...