आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरूनमध्ये पावसात रेल्वे घसरली, ७० ठार, आफ्रिकेतील घटनेत ६०० जण झाले जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
याआेउंदे - पश्चिम आफ्रिकेतील कॅमेरूनमध्ये प्रवासी रेल्वे रुळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेत किमान ७० जणांचा मृत्यू झाला. घटनेत ६०० जण जखमी झाले. रेल्वेत ६०० जणांची आसन क्षमता असताना त्यातून १३०० लोक प्रवास करत होते, असे सरकारी रेडिआेने म्हटले आहे.
घटना घडली तेव्हा मुसळधार पाऊस सुरू होता. कॅमेरूनची राजधानी याआेउंदे येथून दाऊआला शहराकडे जात होती. राजधानी सोडून दोन तासही झाले नाही तोच मृत्यूने घाला घातला.
परिवहनमंत्री एदगार एलन मेबे नागू म्हणाले, रेल्वे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात होती. ही गाडी खड्ड्यात कोसळली. स्थानिक नागरिकांनी रेल्वेच्या काचा फोडून काही प्रवाशांना बाहेर काढले. अनेक प्रवासी जखमी स्थितीत रेल्वेतून बाहेर येताना दिसून येत होते. दरम्यान मदतकार्याला उशिरा सुरूवात झाल्याने अनेकांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही. त्यामुळे घटनास्थळी मृतांची संख्या वाढली. मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

...आणि अचानक उलटली रेल्वे
मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे रेल्वेचा वेग सरासरीपेक्षा कमी होता. परंतु अचानक रेल्वे वेगाने मोठ्या खड्ड्यात जाऊन पडली. दुर्घटनेनंतर लोकांनी मदतीचे आवाज दिले. अनेक लोक जीव मुठीत घेऊन पळत होते. सर्वत्र धूरच धूर दिसत होता. मदतकार्यासाठी अनेक तासांची प्रतीक्षा करावी लागली, असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...