आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिष्काराच्या आवाहनानंतर चिनी माध्यमे संतप्त, भारताविरोधी शिवीगाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - भारतात चिनी उत्पादनांविरुद्ध सोशल मीडियावर सुरू असलेल्या मोहिमेमुळे चीन भडकला आहे. त्याविरोधात चीनची सरकारी माध्यमे आता शिवीगाळ करत आहेत. ‘ग्लोबल टाइम्स’ या सरकारी माध्यमाने म्हटले आहे की, ‘भारत फक्त ओरडू शकतो. तेथे चिनी उत्पादनांबाबत सुरू असलेली चर्चा भडकवणारी आहे. भारतीय उत्पादाने चीनच्या उत्पादनांच्या तुलनेत टिकू शकत नाहीत. दोन्ही देशांतील वाढत्या व्यापार तुटीवरही भारत काही करू शकत नाही.’

या वृत्तपत्राने लिहिले आहे की, पाकिस्तानी दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना चीन सातत्याने विरोध करत आहे. त्यामुळे भारतीय नाराज आहेत. त्यामुळे तेथे सोशल मिडियासह अनेक मंचांवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू झाली आहे. वृत्तपत्राने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मेक इन इंडिया’ ही योजना अव्यवहार्य असल्याचे म्हटले आहे. भारत-अमेरिकेच्या संबंधांवरही टिप्पणी करण्यात आली आहे. अमेरिका कोणाचाही मित्र नाही. फक्त चीनला घेरण्यासाठीच अमेरिका भारताला जवळ करत आहे.

भारतात ना वीज, ना पाणी
वृत्तपत्राने चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करू नये, असे आवाहन केले आहे. भारतात वीज-पाणी यांची कमतरता आहे, लोकही मेहनती नाहीत. खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचार पसरलेला आहे. तेथे गुंतवणूक करणे चिनी कंपन्यांसाठी आत्मघाती ठरेल, असे या वृत्तपत्राने लिहिले आहे.

आपल्या देशातच कारखाने उघडावेत
वृत्तपत्राने लिहिले आहे की, चिनी कंपन्यांनी भारतापेक्षा आपल्या देशातच कारखाने स्थापन करावेत. भारतीय व्यापारी चीनची उत्पादने खरेदी करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत चीनमध्येच येतील आणि त्यांची विक्री भारतात करतील. मग भारतात कारखाने स्थापन करून पैसा बर्बाद करण्यात काय उपयोग?

नेते, उद्योगपती स्वत:चा पैसा खर्च करत नाहीत
‘ग्लोबल टाइम्स’ने लिहिले आहे की, भारताकडे खूप पैसा आहे, पण बहुतांश पैसा राजकीय नेते, अधिकारी आणि काही उद्योगपती यांच्याकडेच आहे. या वर्गाला देशात आपला पैसा खर्च करण्याची इच्छा नाही. त्यामुळेच भारतात मेक इन इंडियासारख्या अव्यवहार्य योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानला वेगळे पाडण्यात यश
ग्लोबल टाइम्समे दुसऱ्या एका लेखात मात्र मान्य केले आहे की, ब्रिक्स-बिमटेक्स परिषदेत पाकिस्तानला वेगळे पाडण्यात भारताला यश आले आहे. त्याचबरोबर स्वत:ला स्वच्छ दाखवून भारताने एनएसजीचे सदस्यत्व आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाबाबतची दावेदारीही मजबूत केली आहे. वृत्तपत्राने लिहिले आहे की, भारताने बिम्स्टेकमध्ये पाकिस्तानव्यतिरिक्त सर्व देशांना बोलावून पाकला विभागात वेगळे पाडले. बिम्सटेक भारतासाठी महत्त्वाचा बदल घडवण्यात महत्त्वाचाी ठरली.
बातम्या आणखी आहेत...