आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रमाच्या वाटेवर गगनचुंबी इमारती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील वास्तुशास्त्रज्ञ फ्रँक लॉइड राइट यांनी ५० च्या दशकात शिकागोमध्ये एक मैल (सुमारे १.६ किलोमीटर) उंचीची इमारत उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. यात अणू ऊर्जेवर आधारित एलिव्हेटर लावायचे होते. आज त्यांचे स्वप्न साकार होत आहे. जगभरात ठिकठिकाणी ‘व्हर्टिकल वर्ल्ड’ संकल्पना राबवली जात असताना सतत  विक्रमी उंची गाठणाऱ्या इमारती बांधल्या जात आहेत. चार वर्षांहून कमी कालावधीत उभारल्या जाणाऱ्या इमारतीचे बांधकाम अमेरिका आणि ब्रिटनची प्रसिद्ध आर्किटेक्ट कंपनी करत आहे.  
 
सध्या जगातील सर्वाधिक उंचीची इमारत ‘बुर्ज खलिफा’ही आहे. तिची उंची ८३० मीटर आहे. न्यूयॉर्क येथील ‘वन वर्ल्ड ट्रेड सेंटर’ची उंची ५४१ मीटर आहे. ‘व्हर्टिकल वर्ल्ड’ संकल्पनेवर आधारित या इमारती अत्याधुनिक डिझाइनसाठी ओळखल्या जातील. अशा इमारती चीनमध्ये अधिक बांधल्या जात आहेत. २०२१ पर्यंत चीनमध्ये सर्वाधिक उंच इमारती असतील. तसेच संपूर्ण आशिया खंडदेखील उंच इमारतींसाठी ओळखला जाईल. या इमारतींशी स्पर्धा करू शकणारी कोणतीही इमारत अमेरिका वा युरोपमध्ये उभारली जात नाही, हे विशेष.  
 
ग्रीनलँड, वुहान (चीन), ६३६ मीटर उंच 
अरुंद कमानीचे डिझाइन असलेली ही इमारत मध्य चीनचे भविष्यातील आकर्षण असेल. टोकाचा भाग गोलाकार घेतल्यामुळे वेगवान वाऱ्यांचा परिणाम इमारतीच्या पायावर होणार नाही, हा यामागील उद्देश आहे. वरील भागाला आधार म्हणून दोन बाजूंनी काच लावण्यात आली असून त्यांचेही डिझाइन वेगवेगळे आहे. पुढील वर्षी इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल. 
 
पुढील स्लाईडवर पाहा विविध प्रकारची इमारतीचे फोटोज आणि माहिती.... 
बातम्या आणखी आहेत...