आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात 16 किमीपर्यंत वाहून गेला हत्ती; नौदलाने दोर बांधून 12 तासांत आणला किनाऱ्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलंबो - हे छायाचित्र श्रीलंकेच्या कोकिलाई समुद्र किनाऱ्यापासून १५ किमी अंतरावरील आहे. हा हत्ती खाडी ओलांडण्याच्या प्रयत्नात समुद्रात वाहून गेला. पाण्यातून बाहेर निघालेल्या सोंडेवर एका गस्त बोटीची नजर पडली. त्याची माहिती वन विभाग आणि नौदलाला पाठवण्यात आली. नौदलाचे चालक समुद्रात उतरले. हत्तीला योग्य रस्ता दाखवून किनाऱ्यापर्यंत आणणे शक्य व्हावे म्हणून त्याला दोराने बांधले. त्यानंतर त्याला हळूहळू खेचून किनाऱ्यापर्यंत आणण्यात आले. या कारवाईसाठी सुमारे १२ तास लागले. संशोधनानुसार हत्ती उत्तम पोहतात, पण सलग पोहण्याची त्याची क्षमता ६ तासच असते.  
बातम्या आणखी आहेत...