आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमरेचा आकारही निर्माण करू शकतो धोका, हृदयरोगाशी केवळ वजनाचा संबंध नाही!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उल्वरहँप्टन (इंग्लंड)  - तुमच्या कमरेचा आकार तुमचे आरोग्य धोक्यात टाकू शकतो. विशेषकरून तुमच्या हृदयासाठी जास्त धोकादायक आहे. कमरेचा घेर जास्त असेल तर हृदयाला धोकाही जास्त असेल. यातून हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेहाची जोखीमही वाढेल. या स्थितीत तुमच्या वजनाचा संबंध येत नाही.
 
इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ वुल्वरहँप्टनच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. त्यांनी सर्व उंचीच्या लोकांसाठी एक तक्ता तयार केला असून त्यात उंचीनुसार कमरेचा घेर जास्तीत जास्त किती असावा हे स्पष्ट केले आहे. त्यांनी त्यास ‘वेस्ट टू हाइट रेशो’ नाव दिले आहे.  
 
संशोधन पथकाचे प्रमुख प्रा. एलन नेव्हिल म्हणाले, आतापर्यंत केवळ बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) हाच निरोगी शरीराचे निकष मानला गेला. वाढत्या वजनाचा संबंध हृदयरोगाच्या जोखमीशी जोडला गेला. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. बीएमआयमध्ये उंची आणि वजनाचे गुणोत्तर प्रमाण दिले जाते. मात्र, एकूण वजनात मांसपेशी व मेदाची (फॅट) माहिती कळू शकत नाही.
 
एखाद्याचे वजन जास्त असेल तर त्यात मेद जास्त असेलच असे नाही. हे वजन त्याच्या हेल्दी मांसपेशीचेही असू शकते. त्याचप्रमाणे एखाद्याचे वजन कमी असले तरी त्यात मेद जास्त असू शकतो. शरीरात सर्वाधिक मेद कमरेत जमा होतो. येथेच शरीराच्या आसपास महत्त्वाचे अवयव असतात. हा मेद संबंधित अवयवांवर थेट परिणाम करतो.
 
पुढील स्लाइडवर तक्त्यात उंचीच्या प्रमाणात जोखमीत टाकू शकणारा कमरेचा घेर दिला आहे. म्हणजे घेर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मधुमेह आदी आजारांचा धोका जवळपास ३३ % पर्यंत वाढू शकतो. आमच्या अभ्यासात या गोष्टी पाहिल्या. बीएमआयप्रमाणे या गुणोत्तराच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राचे काम सुरू आहे, असे नेव्हिल यांनी सांगितले.  
 
पुढे पाहा, कंबर व उंचीच्या प्रमाणाचा तक्ता ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...