आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉल स्ट्रीटमध्ये रोबोट देताहेत आर्थिक सल्ला, 65 कोटी रुपयांपेक्षा जास्त नेटवर्थच्या ग्राहकांना दिली जातेय सुविधा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेटरमेंटचे २५ हजार ग्राहक या सेवेचा उपयोग करत आहेत. चार्ल्स श्वेबचे १५ टक्के ग्राहक, तर मॉर्गन स्टॅन्ले आणि वेल्स फारगोमध्ये रोबोट सल्लागार मानवी कर्मचाऱ्यांसोबत मोफत सेवा देत आहेत. - Divya Marathi
बेटरमेंटचे २५ हजार ग्राहक या सेवेचा उपयोग करत आहेत. चार्ल्स श्वेबचे १५ टक्के ग्राहक, तर मॉर्गन स्टॅन्ले आणि वेल्स फारगोमध्ये रोबोट सल्लागार मानवी कर्मचाऱ्यांसोबत मोफत सेवा देत आहेत.
न्यूयॉर्क   - जगातील सर्वात चर्चित बिझनेस ठिकाण वॉल स्ट्रीट म्हणजेच न्यूयाॅर्क शेअर बाजारात समृद्ध ग्राहकांना आर्थिक सल्ला देण्याचे काम रोबोट करत आहेत. या पद्धतीची सेवा देत असलेली न्यूयॉर्कची कंपनी बेटरमेंटने दिलेल्या माहितीनुसार हे रोबोट अॅडव्हायझर (डिजिटल कर्मचारी) हजारो ग्राहकांची मदत करत आहेत. यातील अनेक ग्राहक तर ६५ कोटी रुपयांचे नेटवर्थ असलेले आहेत.   
 
सिटी समूहाचीही आपल्या श्रीमंत ग्राहकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून सल्ला देण्याची इच्छा आहे. ग्राहकांनी लवकरात लवकर अशा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अॅडव्हायझर्सचा सल्ला घेण्यास सुरुवात करावी, असे समूहाला वाटत आहे. मात्र,   जास्त पैसे घेत असतील तरी ग्राहक सहजासहजी मानवी व्यवस्थापकांना सोडणार नसल्याचेही समूहाला वाटत आहे. तरी बेटरमेंटने बँकेला चुकीचे सिद्ध केले आहे. यांचे अनेक ग्राहक रोबोटकडून आर्थिक सल्ला घेत आहेत.   
 
या रोबोट अॅडव्हायझर्सला सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. ते ग्राहकांना आर्थिक सल्ला देणे तसेच त्यांच्या पोर्टफोलिओच्या व्यवस्थापनात मदत करत आहेत. या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप अत्यंत कमी असतो. हे सिस्टिम कॉम्प्युटर प्रोग्रॅमच्या माध्यमातून गुंतवणूक सल्लागार तयार करतात. यात परंपरागत मानवी ब्रोकर्सच्या तुलनेत अत्यंत कमी शुल्क भरावे लागते. या कामासाठी ब्रोकर व्यवहाराच्या कमीत कमी एक टक्के रक्कम वसूल करतात. आर्टिफिशियल अॅडव्हायझर्सची मदत घेणारी बेटरमेंट एकमेव कंपनी आहे असेही नाही. गोल्डमन सॅक्स, जेपी मॉर्गन चेज आणि चार्ल्स श्वेबसारख्या मोठ्या कंपन्यादेखील या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. परंपरागत ब्रोकर्सच्या तुलनेत ही सुविधा अर्ध्या शुल्कावर मिळत आहे, हेच याचे वैशिष्ट्य आहे.   
 
रोबोट अॅडव्हाइसचे भविष्य चांगले असल्याचे बेटरमेंटला चांगले माहिती आहे. त्यामुळेच कंपनी लवकरात लवकर यावर पूर्णपणे काम करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीचे सीईओ जॉन स्टीन यांनी सांगितले की, “आम्ही आधी सर्व श्रीमंत ग्राहकांना ही सुविधा देत आहोत. पण आता या क्षेत्रात आम्ही स्थापित झालो असल्याचे ग्राहकांना आम्ही सांगू 
 
इच्छितो. जे ग्राहक या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, त्यांच्यासाठी कंपनीने जास्त सुविधा दिलेल्या आहेत. ग्राहकांना आता जास्त पर्याय हवे असल्याचे कंपनीला वाटते. त्यामुळे आम्ही त्यानुसार तंत्रज्ञान अपडेट करत आहोत.’   
 
बातम्या आणखी आहेत...