आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया : क्रीडा, इतर क्षेत्रांतही नियम पायदळी, पाश्चिमात्यांविरोधात आक्रमक रणनीती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्समध्ये युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये रशियन फुटबॉल चाहत्यांनी जो गोंधळ घातला त्यानंतर काही दिवसांनी राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी याबाबत निवेदन करावे अशी मागणी करण्यात आली होती. सेंट पीटर्सबर्गच्या आर्थिक फोरमच्या सदस्यांना त्यांनी असे सांगितले की, माझ्या देशाचे फक्त २०० लोक हजारो ब्रिटिश फुटबॉल रसिकांना कसे मारू शकतात, हेच मला समजत नाही.

फ्रेंच अधिकारी म्हणतात की, निर्दयपणे आखलेली योजना आणि हातात शस्त्रास्त्रे घेतलेल्या काही डझन रशियन फुटबॉल चाहत्यांनी आपल्यापेक्षा संख्येने जास्त असलेल्या लोकांना मारहाण करणे, ही गोष्ट पटतच नाही. या घटनेनंतर युरोपियन वृत्तपत्रात जोरदार टीका झाली की, या हिंसाचाराला रशियन सरकारचीच फूस होती. परंतु या हल्ल्यामुळे स्वदेशात जे वातावरण निर्माण झाले ते टाळू शकले नाही. इगोर लेबेदेव या ज्येष्ठ रशियन खासदाराने ट्वीटरवर हिंसाचार करणाऱ्यांना हिंसा पुढे चालूच ठेवा अशी चिथावणी दिली होती. लेबेदेव हे रशियन फुटबॉल फे़डरेशनचे उपाध्यक्ष आहेत. रशियन लोकांनो पुढे जा, अशा घोषणा प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी दिल्या जात होत्या. २०१२ साली राष्ट्रपती निवडणुकीच्या दरम्यान अशाच स्वरुपाच्या घोषणा ऐकायला मिळत होत्या.

शीतयुद्धाच्या काळात जे गैरसमज झाले होते ते काढून टाकून आणि दमलेल्या मतदारांना एक आणणे असा निर्णय निवडणुकीच्या सुरुवातीला पुतीन यांनी घेतला होता. त्यांची ही कल्पना यशस्वी ठरली. पुतीन यांच्या लोकप्रियतेबरोबरच पश्चिमी देशांबद्दल शत्रुत्त्वाची भावना वाढत गेली. सरकारच्या शक्तिशाली प्रचार यंत्रणेने रशियन लोकांत पश्चिमी देशांबाबतचा विद्वेष पसरवला.

मात्र अशा दुष्ट मोहिमेमुळे रशियाची नैतिक प्रतिमा ढासळली. याची अनेक उदाहरणे आहेत. युक्रेनमध्ये रशियन लष्कराने २०१४ मध्ये क्रिमियावर ताबा मिळवला होता. हे सैनिक रशियन लष्कराच्या गणवेषात नव्हते. त्यांना स्थानिक विद्रोही म्हणून सांगितले गेले. सीरियामध्ये पुतीन सांगत राहिले की, त्यांची लढाऊ विमाने इसिसवर बॉम्बफेक करत आहेत. परंतु प्रत्यक्षात सिरियामध्ये बशर असद यांची सत्ता अबाधित राखण्यासाठी अमेरिक समर्थक सैनिकांवर ते बॉम्बफेक करत होते.

रशियन क्रीडा जगतातही हीच परिस्थिती आहे. सोचीमध्ये २०१४ च्या हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी रशियन सरकारने योजनाबद्ध डंपिंग प्रोग्रॅम चालवला होता. त्यांच्या खेळाडूंना सर्वाधिक पदके जिंकायची होती. ऑलिम्पिकमध्ये गैरव्यवहारचा भंडाफोड झाल्यानंतर सरकारने हे कबूल केले की, चांगला खेळ होण्यासाठी आमचे खेळाडू शक्तिवर्धक औषधे घेत होते.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...