आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनला मात देण्याचा प्रयत्न: 6 शेजारी देशांसाठी 450 कोटी रुपयांचा उपग्रह इस्रो करणार प्रक्षेपित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई  - भारत ५ मे रोजी श्रीहरिकोटाच्या अवकाश संशोधन केंद्रावरून ‘साऊथ एशिया सॅटेलाइट’ प्रक्षेपित करेल. याचे प्रक्षेपण जीएसएलव्ही - एफ ०९ रॉकेटद्वारे होणार आहे. या प्रकल्पावर ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. या मोहिमेत अफगाणिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका सहभागी आहेत.  

इस्रो प्रमुख किरण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ मे रोजी सायंकाळी ४.५७ मिनिटांनी उपग्रहाचे प्रक्षेपण श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्राहून होईल. जीसॅट-०९ मुळे दक्षिण अाशियायी राष्ट्रांतील संवाद दृढ होईल. 
 
हे देश १२ वर्षांत ९६ कोटी रुपये इस्रोला देणार  
} दक्षिण आशिया क्षेत्रात अनेकदा आपत्ती येतात. या काळात उपग्रहाद्वारे संवाद सेतू मजबूत करण्यात येतील.  
} संरचनात्मक विकास, टीव्ही प्रक्षेपण, आपत्ती व्यवस्थापन, टेली-मेडिसीन आणि टेली -एज्युकेशनला गती मिळेल.  
} सदस्य देश ३६-५४ मेगाहर्ट््झ क्षमतेचे ट्रान्सपाँडर पाठवू शकतात. याचा वापर देशांतर्गत मुद्द्यांसाठी करता येईल.  
} या देशांना १२ वर्षांत भारताला ९६ कोटी रुपये द्यावे लागतील.  
 
पाक नसल्याने सार्कऐवजी ‘साऊथ एशिया’ नाव  
या उपग्रहाचे नाव पूर्वी सार्क उपग्रह ठेवण्यात येणार होते. मात्र, पाकिस्तान यातून बाहेर पडल्याने याचे नाव ‘साऊथ ईस्ट सॅटेलाइट’ असे ठेवण्यात आले. भारताच्या या निर्णयामुळे शेजारी देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळेल. सोबतच संवाद क्षेत्रात विकासास मदत मिळेल. पंतप्रधान मोदींनी ३ वर्षांपूर्वी इस्रोला सार्क देशांसाठी उपग्रह बनवण्यास सांगितले होते.
 
इलेक्ट्रिक प्रोपल्शनमुळे २५% इंधन बचत  
इस्रो या प्रक्षेपणासाठी प्रथमच इलेक्ट्रिक प्रॉपल्शन सिस्टिमचा वापर करत आहे. यामुळे २५ % इंधन बचत होईल. परिणामी, केवळ ८० किलोग्रॅम रासायनिक इंधनाने दशकभर पृथ्वीच्या कक्षेत हे परिक्रमा करेल. सामान्यत: २००० -२५०० किलोग्रॅमच्या उपग्रहाला २०० ते ३०० किलो रासायनिक इंधन लागते.  
 
चीनचा क्षेत्रीय प्रभाव कमी करण्याचा अजेंडा  
चीन २००७ पासून अवकाश मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संबंध मजबूत करत आहे. व्हेनेझुएला, नायजेरिया, पाकिस्तान, श्रीलंकेसह त्यांनी उपग्रह प्रक्षेपित केले. संयुक्त उपग्रह पाठवण्याचा प्रयत्न चीनने केलेला नाही. यासाठी मोदींनी पुढाकार घेऊन येथील चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...