आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टांझानियामध्ये शाळेची बस दरीत कोसळली; 34 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोडोमा - टांझानियात शनिवारी एक शाळेची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३४ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

विद्यार्थी आंतरराष्ट्रीय मॉक परीक्षा देण्यासाठी या बसने जात होते. त्याचवेळी एका गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण गमावले. त्यात ही बस मरेरा दरीत कोसळली. पोलिस कमांडर चार्ल्स मुकुंबो म्हणाले, बसमध्ये अॅरुषा येथील प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी व अनेक शिक्षकही होते. बस दरीत कोसळल्यावर ती झाडांमध्ये अडकली होती. त्यातून प्रवास करणाऱ्या सर्वांचे मृतदेह बाहेर काढतानाच बचाव पथकाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
बातम्या आणखी आहेत...