आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद कारमध्ये आईसह बहीण-भावाचे मृतदेह आढळले, हिमाचल प्रदेशातील पांवटासाहिबची घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला  - हिमाचल प्रदेशच्या पांवटासाहिबमध्ये मंगळवारी पोलिस ठाण्यासमोरील एका बंद कारमध्ये तीन मृतदेह आढळून आले. मृतदेहांची आेळख पटली आहे. रमींद्र कौर रंधावा या महिलेसह तिच्या दोन मुलांचे हे मृतदेह आहेत.  

रमींद्र यांचा मुलगा जसवीरसिंग रंधावा व मुलगी इंद्रप्रीत कौर यांचा मृतांमध्ये समावेश आहे. कारमध्ये एक गॅस सिलिंडरही आढळून आले आहे. त्याची गळती होत होती, असे पोलिसांनी सांगितले. ही कार पार्किंगमध्ये उभी होती. कारमध्ये तीन लोक असल्याकडे एका मजुराचे लक्ष गेले. परंतु त्यांची हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्याने कंत्राटदाराला त्याची माहिती दिली. पोलिसांनी कारमधील वाहन परवाना काढला. त्यानंतर मृतांची आेळख पटू शकली.  
 
सिलिंडर जप्त : पोलिसांनी कारमधून एक सिलिंडर जप्त केला आहे. कारला मधून लॉक करण्यात आले होते. कारमधील सर्वांचा वायू गळतीने मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.  
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...