आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोरणे रोखण्यासाठी स्मार्ट बेडची निर्मिती, ७ अंशांच्या कोनात डोक्याची स्थिती बदलली जाते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील कंपनी सलेक्ट कम्फर्टने स्मार्ट बेड तयार केला असून यावर झोपल्यास आपोआप घोरणे रोखले जाते, असा दावा कंपनीने केला आहे. घोरणाऱ्या व्यक्तींमुळे इतरांची झोपमोड होण्याचे प्रकार दररोज घडतात. या त्रासातून आता मुक्तता मिळेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. निश्चिंत झोपेची हमी कंपनीने दिली आहे.
  
सीईएस ट्रेड शोमध्ये हा स्मार्ट बेड सादर करण्यात आला. स्लीप नंबर नामक कंपनीने लास वेगास येथील शोमध्ये याचा डेमो दिला. बेडवर झोपणाऱ्या दोघांनाही आरामात झोपण्याचे स्वयंचलित तंत्र यात आहे.
  
क्रांतिकारक उत्पादन :  स्लीप नंबर ३६० स्मार्ट बेड हे कंपनीचे क्रांतिकारक उत्पादन आहे. आम्हाला हे सादर करताना अत्यानंद होत असल्याचे कंपनीचे सीईआे शेली इबॅच यांनी सांगितले. लोकांना आपल्या अंथरुणाकडून ज्या अपेक्षा असतात त्यापेक्षाही पुढचा टप्पा कंपनीने गाठला आहे. त्यामुळे सलेक्ट कम्फर्ट या अमेरिकन कंपनीने स्लीप नंबर मॅट्रेसची श्रेणी ग्राहकांच्या अपेक्षा उंचावतील. 

असे होते घोरणे बंद
एखादी व्यक्ती पाठीवर झोपली असेल तर घोरते. यातील प्रणाली घोरणाऱ्या व्यक्तीच्या डोक्याची स्थिती ७ अंशांच्या कोनात बदलते. त्यामुळे घोरणे कमी किंवा बंद होते. व्यक्तीच्या झोपण्याच्या सवयी, वेळांच्या नोंदी यात असतात. यात स्मार्ट अलार्म फीचर आहे. त्यामुळे योग्य वेळी जाग येते. सीईएस इनोव्हेशन पुरस्कारांच्या गृहोपयोगी श्रेणीत या स्मार्ट बेडला नामांकन मिळाले आहे.

सेल्फ अॅडजस्टिंग तंत्र 
मॅट्रेसवर झोपणारी व्यक्ती रात्रभर सेल्फ अॅडजस्टिंग कम्फर्ट फीचर्सचा वापर करू शकते. झोपेतही शेजारील व्यक्तीला मुळीच त्रास होऊ नये, अशी प्रणाली यात आहे. झोपेत कूस बदलली तरीही शेजारील व्यक्तीची झोपमोड होणार नाही.
बातम्या आणखी आहेत...