आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाच्या प्राध्यापकाने बनवला सौरऊर्जेवर चालणारा मोबाइल; बॅटरीची गरज नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी सौरऊर्जेवर चालणारा मोबाइल हँडसेट तयार केला आहे. त्यात कुठल्याही प्रकारच्या बॅटरीची गरज नाही. परंपरागत मोबाइल हँडसेट जेवढी वीज वापरतात त्याच्या एक टक्केच वीज या मोबाइलसाठी लागते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संगणक विज्ञान विभागाचे प्रा. श्याम गोलकोटा यांनी सांगितले की, विजेचा वापरच करणार नाही, असा मोबाइल आम्हाला तयार करायचा होता. आयआयटी मद्रास येथून बी. टेक. करणाऱ्या गोलकोटा यांनी मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी केली आहे.  
 
मोबाइल डिझाइन करणाऱ्या चमूने सांगितले की, हा मोबाइल दोन पद्धतीने चार्ज केला जाऊ शकतो. डाळिंबाच्या आकाराचे सौर पॅनल तयार करण्यात आले आहे, ते हा मोबाइल चार्ज करते. दुसरा प्रकार म्हणजे रेडिओ तरंगांद्वारे चार्जिंग. प्रा. गोलकोटा यांनी सांगितले की, विजेचा वापर कमीत कमी व्हावा, असे आपल्याला खरेच वाटत असेल तर पर्यावरणातून वीज घ्यावी लागेल. त्यामुळे आम्हाला त्याच्या डिझायनिंगवर खूप काम करावे लागले.  
 
चमूतील आणखी एक वरिष्ठ प्राध्यापक जोशुआ स्मिथ यांनी सांगितले की, ‘सध्या खूप लोक मोबाइलवर अवलंबून असतात. त्यामुळे बॅटरीविना वापर करता येईल असे उपकरण आम्ही बनवले आहे. आम्ही विचार केलेल्या संकल्पनेचा निकाल चांगला आला. भविष्यात हे तंत्रज्ञान दररोज उपयोगी ठरणाऱ्या उपकरणांसाठीही उपयुक्त ठरेल. या चमूने सर्वाधिक वीज वापरणारा घटकच मोबाइल उपकरण बनवताना हटवला. हा घटक माणसाच्या आवाजाचे (अॅनालॉग) रूपांतर डिजिटल डाटात परिवर्तित करतो. हाच डाटा ट्रान्समिट होतो.’  
 
हा मोबाइल बनवण्यासाठी ऑफ द शेल्फ वस्तूंचा (सॉफ्टवेअर/सर्व्हिस) वापर केला आहे. ते सॉफ्टवेअर बाजारात नाहीत. त्या मोबाइल निर्माता कंपनीकडून थेट खरेदी केल्या जातात. या तंत्रज्ञानाच्या वापराची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.  
 
तज्ज्ञ आणि वापरकर्त्यांना कामगिरीवर नाही विश्वास
हे तंत्रज्ञान समोर आल्यानंतर तंत्रजगताचे लोक आणि मोबाइल वापरकर्ते अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित करत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ‘मोबाइल वीज वापरत नसेल तर त्याची कामगिरी निश्चितपणे कमजोर असेल. स्क्रीन ब्राइटनेसही कमी असेल.’ दुसरीकडे, वापरकर्त्यांच्या मते, पॉवरफुल बॅटरी असूनही मोबाइल ऑपरेट होतातच असे नाही. निराशा येते. त्यामुळे हे विना बॅटरीचे मोबाइल कितपत उपयुक्त ठरतील? मोबाइलचा संपूर्ण मागील भागच सौर पॅनलचे असता तर त्याची पॉवर थोडी वाढली असती.
बातम्या आणखी आहेत...