आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरियांत ६६ वर्षांनंतर तणाव, जगाने आम्हाला आण्विक शक्ती मानावे : उत्तर कोरिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल/टोकियो - उत्तर कोरियाने आण्विक चाचणी घेतल्यानंतर कोरियन प्रदेशात तणाव निर्माण झाला आहे. सुमारे ६६ वर्षांपूर्वी अशाच प्रकारचा तणाव पाहायला मिळाला होता. गेल्या आठवड्यातील वेगवान घडामोडीनंतर अमेरिका व दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला धमकी दिली आहे, तर आम्हाला आण्विक शक्ती म्हणून स्वीकारा, असे उत्तर कोरियाने अमेरिकेला बजावले आहे.

यशस्वी आण्विक चाचणीनंतर उत्तर कोरियाने अमेरिकेच्या धमकीला हास्यास्पद म्हटले आहे. उत्तर कोरियाने आपल्या कृतीवर नियंत्रण ठेवले नाही तर राजधानी प्योगाँग नष्ट करू, अशी धमकी दक्षिण कोरियाने दिली आहे. वेगळे पडलेल्या उत्तर कोरियाने शुक्रवारी पाचवी व सर्वात शक्तिशाली अणुबाॅम्बची यशस्वी चाचणी घेतली होती. आता अणुबाॅम्बने हल्ला करण्याची क्षमता आमच्याकडे आली आहे. त्यामुळे अमेरिकेने आम्हाला कमकुवत मानण्याची चूक कदापिही करू नये. अमेरिका रणनीतीच्या पातळीवरील वास्तव नाकारण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु हे म्हणजेच हाताने सूर्य झाकण्याचा प्रयत्न करण्यासारखा मूर्खपणा आहे, अशा शब्दांत उत्तर कोरियाच्या परराष्ट्र विभागाने अमेरिकेच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे. विशेष दूत सुंग रविवारी म्हणाले, कोरियाने संयुक्त राष्ट्राच्या नियमांचे उल्लंघन करून पाचवी आण्विक चाचणी घेतली आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, त्रिकुटाची भेट, ५ बड्यांची सज्जता
बातम्या आणखी आहेत...