आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पीडस्टार युसेन बोल्टचे फुटबॉलप्रेम पुन्हा एकदा जगजाहीर; टीव्ही शोदरम्यान फोन करून अँकरला दिला सुखद धक्का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मँचेस्टर- जगातील सर्वात वेगवान धावपटू युसेन बाेल्ट हा इंग्लिश फुटबाॅल क्लब मँचेस्टर युनायटेडचा माेठा फॅन अाहे. ताे या क्लबचा प्रत्येक सामना पाहताे. क्लबवर असलेल्या त्याच्या प्रेमाचा पुन्हा एकदा प्रत्यय अाला. त्याने मँचेस्टर युनायटेडच्या टेलिव्हिजन चॅनल एमयूटीव्हीवरील सामन्यानंतर होणाऱ्या चर्चेदरम्यान प्रेक्षक म्हणून फाेन केला हाेता. त्याच्या फाेनने टीव्ही अँकरला एक सुखद धक्काच दिला. मँचेस्टर युनायटेडने ईपीएलमध्ये मिडिल्सबाेराे क्लबला २-१ ने पराभूत केले. त्यानंतर एमयूटीव्हीवर या सामन्याची चर्चा रंगली हाेती. यामध्ये चाहते (काॅलर) फाेन करून अापला सल्ला देऊ शकता किंवा चर्चेत सहभागी हाेऊ शकतात.  
 
यादरम्यान, टीव्ही अँकर मेंडी हेन्रीकडे एक फाेन अाला. या वेळी मेंडी म्हणाली की, अाता अापले पुढचे काॅलर अाहेत युसेन, अाॅलिम्पिक चॅम्पियन युसेन बाेल्ट नाही. मात्र, फाेनवर समाेरून बाेलणाऱ्याने तिला थांबवले अाणि म्हणाल की, मी स्वत: युसेन बाेल्ट बाेलत अाहे. याचा मेंडीला माेठा धक्काच बसला. ‘मी मँचेस्टर युनायटेडच्या विजयाने खुश अाहे. क्लबच्या खेळाडूंनी मैदानावर अापली प्रतिभा दाखवली. त्यामुळे हा सामना अधिक जबरदस्त राहिला,’असे युसेन बाेल्ट फाेनवर म्हणाला.  

या वेळी मेंडी अाश्चर्यचकित हाेऊन सारे काही एेकत हाेती. मात्र, तिने प्रसंगावधान राखून स्वत:ला सावरले. अाेके युसेन, फाेन केल्याबद्दल धन्यवाद. 
बातम्या आणखी आहेत...