आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कृष्णवर्णीयांची भीती लक्षात घ्यावीच लागेल\', डलास गोळीबारावर हिलरींची प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - डलास शहरातील गोळीबाराने अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. श्वेतवर्णीयांना कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकनांना जगण्याबद्दल वाटणारी भीती, चीड लक्षात घ्यावीच लागेल. त्यांची मुले काय करत आहेत, कशी खेळत आहेत इत्यादी गोष्टी जाणून घ्याव्या लागणार आहेत, असे मत डेमोक्रॅटिक पार्टीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी व्यक्त केले आहे.
श्वेतवर्णीयांना कृष्णवर्णीयांच्या भावना लक्षात घ्याव्या लागतील. आेरलँडोमध्येही काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. त्या शिवाय पोलिस अधिकाऱ्यांना वाटणारी भीतीही ऐकून घ्यावी लागेल. त्यांना दररोज नवीन संकटाशी मुकाबला करावा लागत आहे, असे हिलरी म्हणाल्या. एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे मत व्यक्त केले. डलासमधील गोळीबाराच्या घटनेनंतर हिलरींनी पेनसिल्व्हेनियातील सभा रद्द केली होती. रिपब्लिकनचे डोनाल्ड ट्रम्प यांनीही फ्लोरिडातील सभा रद्द केल्या.
बेजबाबदार असल्याचा आरोप फेटाळला
देशाच्या सुरक्षेसंबंधीच्या संवेदनशील माहितीबद्दल हिलरी यांचे कमालीचे बेजबाबदार वागणे होते, हा एफबीआयचा आरोप क्लिंटन यांनी फेटाळून लावला. क्लिंटन परराष्ट्रमंत्री पदावर असताना खासगी ई-मेलचा वापर करत. गोपनीय माहिती ई-मेलवरून शेअर केल्याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर त्या वादात सापडल्या. परंतु त्यावरील वाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर हिलरी पहिल्यांदाच जाहीरपणे बोलल्या आहेत.
भीतीच्या छायेखाली कोणीही जगू नये
अमेरिकेत कोणत्या समुदायाने भीतीच्या छायेखाली जगता कामा नये. पोलिसांनीदेखील भयमुक्त वातावरणात आपले कर्तव्य बजावले पाहिजे. भीतीयुक्त वातावरण नाहीसे करायचे असल्यास सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे आवाहन हिलरींनी केले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...