आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक कलाकारांवरील बंदीला पाठिंबा, अनेक मुद्द्यांवर स्वामी यांनी मांडली भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी असावी. लोकभावनेचा अनादर केला जाऊ शकत नाही, असे सांगून भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.

सध्याची परिस्थिती वेगळी आहे. भविष्यात कदाचित पाकिस्तानसोबत युद्धही होऊ शकते. यापूर्वीही चार वेळा पाकिस्तानसोबत युद्ध करावे लागले आहे. लोकांचे मन जाणून घेताना त्यांच्या भावनांकडे कानाडोळा करत येणार नाही. पाकिस्तानचे चित्रपट कलाकार, क्रिकेटपटू भारतात येऊन काम करतात. खेळतात. त्यांना परवानगी दिली जाऊ नये. पाकिस्तानात सर्वकाही सुरळीत झाल्यानंतर क्रिकेट व चित्रपटावरील बंदी पहिल्यांदा आम्ही दूर करू, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. ‘इंडिया अँड पाकिस्तान : अ सबकाँटिनेंटल अफेअर’ या विषयावरील परिषदेत स्वामी यांनी हे मत व्यक्त केले आहे. ही परिषद न्यूयॉर्क विद्यापीठात शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. त्यात आपल्या विशिष्ट शैलीत चर्चा केली.

दहशतवादाला क्षमा नाहीच
सध्याच्या परिस्थितीत तणाव असला तरी युद्ध होईल, असे नाही. परंतु नरेंद्र मोदी सरकार दहशतवादाला कधीही क्षमा करणार नाही. युद्ध झाले नाही तरी दहशतवाद्यांना योग्य पद्धतीने दणका देणारे हे सरकार आहे. देशाचा मूडही सरकारने लक्षात घेतला आहे, असे स्वामी यांनी दहशतवादाच्या एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

काश्मीरवर नव्हे, दहशतवाद नष्ट करण्यावरच चर्चा शक्य
पाकिस्तानशी काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा होणार नाही. उभय देशांत केवळ दहशतवाद कशा प्रकारे नष्ट केला जाईल, यावर आधी चर्चा होऊ शकते. सुरुवातीला पाकिस्तानने अंतर्गत पातळीवर लष्कराला शिस्त लावली पाहिजे. दहशतवादाला नष्ट करून सामान्यांना मुक्तपणे जगता येईल, असे वातावरण तयार केले पाहिजे. अन्यथा भारतातील कोणतेही सरकार त्यांच्याशी चर्चा करू शकणार नाही, असे स्वामी यांनी म्हटले आहे. अजुनही सीमेवर पाककडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. त्यावरून सीमेवर तणाव आहे.
बातम्या आणखी आहेत...