आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राची आेडिशात यशस्वी चाचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालासोर (आेडिशा) - भारताने आेडिशाच्या किनारपट्टीवर ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची शनिवारी यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र ३०० किलो ग्रॅम वजनी शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे.

सकाळी सुमारे ११.३३ वाजण्याच्या सुमारास चांदीपूरमध्ये एकिकृत चाचणी केंद्रावरून एका मोबाइल लाँचरच्या साह्याने क्रूझ क्षेपणास्त्र डागण्यात आले. संरक्षण संशोधन तथा विकास संस्थेच्या (डीआरडीआे) अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० किलोमीटरहून ४५० किलोमीटर एवढी करण्यात आली आहे. या प्रकल्पाशी संबंधित डीआरडीआेचेे एक वरिष्ठ संशोधक म्हणाले, हे क्षेपणास्त्र ३०० किलो ग्रॅम शस्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहे. त्याला अगोदरच लष्कर व नौदलात सामील करून घेण्यात आले आहे. हवाई दलात सामील करण्यासाठी त्याची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. संशोधक म्हणाले, क्षेपणास्त्राचे वायू प्रक्षेपण व पाणबुडी प्रक्षेपणाच्या नव्या प्रकल्पावर देखील संस्थेचे काम सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...