आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतवंशीयांचा ‘आेबामा केअर’ला पाठिंबा, लोकप्रतिनिधी सभागृहात प्रस्ताव मंजूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील भारतवंशीय लोकप्रतिनिधींनी आेबामा केअरला पूर्ण पाठिंबा दिला आहे. ट्रम्प सरकारने मांडलेल्या नव्या योजनेच्या प्रस्तावाला त्यांचा विरोध करताना त्याच्याविरोधात मतदान केले. हा प्रस्ताव लोकप्रतिनिधी सभागृहात मंजूर झाला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी झाल्यास सुमारे २ कोटी ४० लाख अमेरिकन नागरिकांवर आरोग्य सेवेपासून वंचित होण्याची वेळ आली आहे, अशी भारतीयांची चिंता आहे.  
 
लोकप्रतिनिधी सभागृहात भारतवंशीय चार प्रतिनिधी आहेत. अॅमी बेरा (डेमॉक्रॅटिक पार्टी), रो खन्ना, प्रमिला जयपाल, राजा कृष्णमूर्ती यांनी नवीन प्रस्तावाला एकमुखी विरोध दर्शवला. हा प्रस्ताव रिपब्लिकन पार्टीच्या वतीने मांडण्यात आला होता. एकीकडे व्हाइट हाऊसमध्ये रिपब्लिकन नेते प्रस्ताव मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत होते.
 
 तेव्हा देशातील लाखो सामान्य नागरिक, नोकरदारांची चिंता वाढली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसमन बेरा यांनी दिली आहे. बेरा स्थानिक रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आहेत. त्याचबरोबर ते यूसी डेव्हिस स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये अध्यापनाचेही कार्य करतात.  
 
नेमकी चिंता काय?  
आेबामा केअरपासून दूर गेल्यामुळे अनेक समस्या वाढू शकतात. कारण नव्या योजनेतील नियम सामान्यांसाठी दिलासा देणारे मुळीच नाहीत. त्यात अस्थिरोग, मधुमेह, हृदयरोग यांसारख्या आजारात सामान्यांना नव्या योजनेचा लाभ होत नाही. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरते, अशी माहिती बेरा यांनी दिली.  
 
कर्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार 
-सरकारने मंजूर केलेले विधेयक सामान्य जनतेबद्दलच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार आहे. सुमारे २ कोटी ४० लाखांहून अधिक नागरिकांना नव्या योजनेतील जाचक नियमांमुळे बाहेर व्हावे लागणार आहे. वास्तविक आरोग्य सुरक्षा हा सामान्यांचा हक्क आहे. त्यापासून त्याला नवा कायदा वंचित करत आहे. आम्ही त्यास विरोध करत आहाेत.
प्रमिला जयपाल, लोकप्रतिनिधी.  
 
बातम्या आणखी आहेत...