आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकजुटीच्या बळातून सार्क देशांचा विकास शक्य होईल : सुषमा स्वराज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोखारा - आशियात आर्थिक तसेच संपर्काच्या पातळीवरील एकजुटीतूनच सार्क देशांना आपला विकास साधता येऊ शकेल, असे मत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे.
३७ व्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या मंत्रिस्तरीय बैठकीत गुरुवारी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रादेशिक देशांनी परस्परांशी करार करण्याचा मार्ग मोकळा करावा. संघटनेच्या सदस्यांनी रेल्वे तसेच रस्ते वाहतुकीशी संबंधित करारावर सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे जायला हरकत नाही. व्यापार आणि सेवेच्या पातळीवर भारताने एकीकृत आर्थिक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे कराराची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. परंतु त्यासाठी अगोदर आपल्याला आशियाई आर्थिक संघटनेची गरज निर्माण झाली आहे. तसे घडून आल्यास आशिया जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा प्रदेश ठरू शकतो. मात्र, प्रादेशिक एकजुटीची निकड आहे.
बातम्या आणखी आहेत...