आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रमक हवाई कारवाई करणाऱ्या रशियाची सिरियाच्या युद्धभूमीतून माघार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉस्को- सिरियातील बंडखोरांच्या विरोधात आक्रमक हवाई कारवाई करणाऱ्या रशियाने आता आपल्या सैनिकांना मायदेशी परतण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे युद्धभूमीतून एक विमान माघारी येणार आहे. 
 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या आदेशानुसार संरक्षण मंत्रालयाने आपले लष्करी पथक माघारी बोलावण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती रशियाचे लष्करप्रमुख वॅली गेरासिमोव्ह यांनी दिली. अॅडमिरल कुझ्नेत्सोव्ह यांच्या नेतृत्वाखाली मायदेशी परतणारे सैन्य ही देेेेेशाची पहिलीच सैन्य तुकडी ठरणार आहे. लष्करी उद्दिष्टांचा पूर्तता झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबर २०१५ पासून रशियाने भूमध्य सागरी देशातील असाद सरकारला आपला सक्रिय पाठिंबा दर्शवला होता. त्यानुसार बंडखोरांच्या विरोधात थेट कारवाईसाठी हवाई दलाचा वापर करण्यात आला होता. 
 
शस्त्रसंधीचे उल्लंघन हाच शांती चर्चेतील अडथळा  : कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये या महिन्यात सिरिया प्रश्नी शांती चर्चा होणार आहे. ती यशस्वी व्हायला हवी. कारण शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याच्या अनेक घटना घडल्या. त्याच शांती चर्चेतील अडथळा ठरल्या आहेत, असे तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेव्हलुट कावुसोग्लू यांनी म्हटले आहे. कावुसोग्लु यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरिस यांच्याशी शुक्रवारी सिरियाच्या मुद्द्यावर चर्चा केली.  दरम्यान, तुर्की सैन्याने उत्तरेकडील सिरियात शुक्रवारी केलेल्या हवाई हल्ल्यात इसिसच्या ३२ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तुर्कीने हवाई हल्ल्याद्वारे उत्तरेकडील इसिसच्या अड्ड्यांना लक्ष्य केले. 

सिरियाच्या हल्ल्यामुळे  पाणीसाठ्याला धोका  
युद्घात होरपळणाऱ्या सिरियात सैन्याने दमास्कसजवळ एक हवाई हल्ला केला होता. त्यामुळे ५० लाखांवर लोकसंख्येच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. २२ डिसेंबरपासून परिसरातील लाखो लोकांना पाण्याचा पुरवठा होत नाही. तो खंडित झाला आहे. अशी कारवाई करणे अयोग्य आहे. ही कृती म्हणजे युद्ध गुन्हेगारी आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्राने इशारा दिला आहे.  
 
 
बातम्या आणखी आहेत...