आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक कंपन्यांना कॅनडाची ऑफर, सॅनफ्रान्सिस्कोप्रमाणे सुविधा आणि करांमध्ये सूट देण्याचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हँकूव्हर, कॅनडासारख्या आधुनिक गॅसटाऊन भागामध्ये कोणत्याही दिवशी एखादा युवक इंजिनिअर विटांच्या रस्त्यांवरून सायकलवर बसून ऑफिसला जाताना दिसतो, जेथे तो अब्जावधी रुपयांच्या कल्पनेला जन्म देणारा कोड लिहिणार असतो. शहरात जवळपास ७५ हजार टेक्निकल कर्मचारी काम करतात. यापैकी काहीजण फेसबुक आणि गुगल यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांशी संबंधित आहेत. कॅनडाचे अधिकारी अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन आणि व्हिसा धोरणांची भीती दाखवून टेक्निकल कंपन्यांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत नोकऱ्यांची संधी देण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या ट्रम्प यांच्यासाठी ही एक प्रकारची वाईट चेष्टाच म्हणावी लागेल, परंतु त्यांच्या धोरणाने नोकऱ्या बाहेरच्या देशात जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय कौशल्यावर आधारित टेक्निकल कंपन्या काही मुस्लिमबहुल देशातील लोकांवर बंदी घालण्याच्या प्रयत्नामुळे संतापले आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांचा असा अंदाज आहे की, त्यांचे २०० कर्मचारी विदेशात आहेत आणि त्यांच्यावर ट्रम्प यांच्या धोरणाचा परिणाम होणार आहे. या कर्मचाऱ्यांना सीमेवर अटक केली जाण्यापासून वाचवण्यासाठी त्यांना अमेरिकेत पाचारण करण्यात आले आहे. काही वेळानंतर गुगलने कॅनडा सरकारच्या इंटेलिजन्स लॅबरोटरीमध्ये ५० लाख डॉलर गुंतवण्याची घोषणा केली. टेक्निकल कंपन्या, उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांना विदेशातून बोलवण्याची परवानगी देणाऱ्या एच-१ बी व्हीसाची संख्या न वाढवण्याच्या निर्णयामुळे त्रासून गेले आहेत. इकडे ३ एप्रिलला न्याय विभागाने कंपन्यांना धमकी दिली की, जर या कंपन्या योग्य अमेरिकन्सचा शोध घेत नसतील तर त्यांच्या विरोधात  कारवाई करण्यात येईल. 
 
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडू यांनी ट्वीट केले की विविधता ही आमची ताकद आहे. व्हँकूव्हरचे महापौर ग्रेगोर रॉबर्टसन यांचे म्हणणे आहे की, त्यांचे शहर जेथे कोणा एका संस्कृतीचे प्रभुत्त्व नाही, ते शहर अन्य लोकांचे स्वागत करताना एका अभिमानाचा अनुभव घेते. रंगभेद आणि भेदभाव याबाबत आमचे धोरण कडक आहे. कॅनडाने हायटेक कंपन्यांना सोपी इमिग्रेशन प्रक्रिया, मोफत सरकारी आरोग्यसेवा आणि करसवलतीचा वायदा केला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की, इमिग्रेशन मंत्री अहमद हुसेन हे सोमालियाचे आहेत, ज्या देशावर ट्रम्प यांनी निर्बंध घातले आहेत.  काही अमेरिकन अधिकारी परिस्थितीत बदल होत नसल्यामुळे कॅनडातून निर्माण होणारा राजकीय आणि आर्थिक धोका मान्य करतात. या दरम्यान सरकारने खासदारांना पाठवलेल्या पत्रात हायटेक क्षेत्रामध्ये खुलेपणा आणण्याचे धोरण अधोरेखित केले. व्हँकूव्हरसाठी टेक्निकल कामगारांची भरती करणारी नवी कंपनी ट्रू नॉर्थचे माइक टिपेट यांचे म्हणणे आहे की, तुम्ही दहा लोकांशी बोललात तर त्यापैकी नऊ जण बाहेरून आलेले दिसतील. येथे मरिजुआना रिटेल स्टोअर, शाहाकारी हॉटेल तसेच अन्य सुविधा मिळतात. त्यामुळे इतर देशांचे लोक येथे येणे पसंद करतात. सनफ्रान्सिस्को हा देश पहिल्याप्रमाणेच आहे. जर ट्रम्प यांच्या धोरणांमुळे लोक बाहेर जात असतील तर पैसा आणि प्रतिभेने संपन्न असलेल्या सनफ्रान्सिस्कोप्रमाणे होतील.
 
सुविधांची रेलचेल- अमेरिकेतून कागदपत्रांच्या मंजुरीची वाट पाहणाऱ्या कामगारांसाठी  व्हँकूव्हरमध्ये अनेक कंपन्यांनी सुविधा केंद्रे उघडली आहेत. शहरात अॅमेझॉनचे सातशे कर्मचारी काम करतात आणि त्यांची संख्या वाढतच आहे. मायक्रोसॉफ्टने ऑफिस बनवले आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, आधुनिक विद्युत ग्रीडवर वाढला सायबर हल्ल्याचा धोका...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...