आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडला पुराचा तडाखा, 25 ठार, 10 लाखांवर बेघर, दक्षिणेकडील 12 प्रांतांतील जनजीवन विस्कळीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - थायलंडच्या दक्षिणेकडील प्रदेशाला पुराचा तडाखा बसला असून त्यात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात नूतन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागले आहे.  

मुसळधार पावसानंतर थायलंडमध्ये पूर आला अाहे. त्यामुळे दक्षिणेकडील प्रदेशातील व्यापार आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. प्रदेशाला जोडणारा महामार्ग पाण्यात वाहून गेल्याने त्याचा देशाशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाने १२ प्रदेशांना तडाखा बसला आहे. १ जानेवारीपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे सुमारे १० लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. दहा दिवसांनंतरही महत्त्वाचे विमानतळ तसेच शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. अजुनही मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.  
 
पर्यटनाचे नुकसान  
थायलंडमधील समुद्र किनारे पर्यटकांना खुणावतात. परंतु यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या अवकाळी पावसाने पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान केले आहे. किनारे आणि रिसॉर्टवर पर्यटकांची एरवी खूप गर्दी पाहायला मिळते. मात्र, यंदा परदेशी पर्यटकांनी भीतीने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पर्यटन विभागाने चिंता व्यक्त केली आहे.