बीजिंग - चीन च्या सरकारी वृत्तपत्राने शुक्रवारी सांगितले की, जर अमेरीकेने चीनला दक्षिण चीन समुद्रात आयलंड म्हणजे बेट बनविण्यापासून रोखल्यास युध्द होईल. चीनच्या बाजूने हे विधान अमेरीकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन यांच्या चिथावणीनंतर समोर आले आहे.
टिलरसन यांनी गुरुवारी सिनेटच्या विदेशी संबंधांशी संबंधीत समितीच्या समोर
आपली रणनीती सादर केली होती. या दरम्यान त्यांनी सांगितले होते की, आम्ही चीनला सांगू की, त्यांनी बेटावरील वा बेटाचे निर्माण-बांधकाम कार्य बंद करावे. हे बेकायदेशीर आहे. चीनला हे देखील सांगू की, दक्षिण चीन सागरातील बेटावर त्यांच्या दखल घेण्याला अनुमतीच नाहीये. या क्षेत्रात चीनच्या हालचाली चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. मला तर हे वाटते की, यावर प्रतिक्रिया न दिल्यानेच ते (चीन) त्या दिशेने पुढे जाताहेत. त्यांनी सांगितले की, ते चीनला हा संदेश देऊ इच्छितात की, त्यांनी म्हणजे चीनने हा वादग्रस्त दक्षिण चीन सागर खाली करुन दिला पाहीजे.
चीनी सरकारी वृत्तपत्राने शुक्रवारच्या आपल्या संपादकीयमध्ये म्हटले आहे की, जर अमेरीका दक्षिण चीन सागरात चीनला येण्यापासून रोखू इच्छित असेल तर त्यास मोठ्या प्रमाणावरील युध्द लढावे लागेल. यात पुढे लिहिले आहे की टिलरसन जर एका मोठ्या आण्विक शक्तीला त्याच्याच प्रदेशातून बाहेर काढू इच्छित असेल तर, त्यांना एक उत्तम आण्विक शक्तीची रणनीती डावपेच आखावे लागतील. वृत्तपत्राने हे देखील लिहिले आहे की, याच गोष्टीची अधिक शक्यता आहे की, अमेरीकी कॉंग्रेसने टिलरसनच्या या निवडीला मतदान करावे.
तर व्हिएतनाम फिलीपाईन्सवरही लावावी बंदी
दक्षिण चीन सागरावर व्हिएतनाम आणि फिलीपाईन्स ही दावा करतात. यावर प्रश्न उचलून वृत्तपत्राने लिहिले आहे की, चीनची पहुंचेला रोखण्याचा अर्थ आहे की, व्हीएतनाम आणी फिलिपाईन्सलाही तिथे घुसण्यापासून रोखायला हवे.
काय आहे दक्षिण चीन सागरी वाद
नैसर्गिक संपदेने संपन्न आणि उर्जा स्त्रोताने भरपूर फायदेशीर असणाऱ्या दक्षिण चीन सागरातून वार्षिक जवळपास ३. ४० लाख रुपयांचा व्यवसाय होतो. चीन या संपूर्ण क्षेत्रावर आपलाच एकाधिकारशाही दाखवत आहे. चीनसह फिलीपाईन्स, मलेशिया, तैवान, व्हीएतनाम, ब्रुनेई देखील या सागराच्या विविध भागावर दावा करतात. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने चीनचा एकाधिकार धुडकावून लावल्यानंतरही चीनने आपल्या हालचाली वेगवान करुन वाढविल्या आहेत. यावर अमेरीकेचे म्हणणे आहे की, चीनने न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहीजे. या प्रदेशात अमेरीकी नौदल आणि हवाई दलाची वाहनेही येत-जात असतात. ज्यावर चीन नाराजी व्यक्त करत असतो.