आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेन डेड महिलेला विक्रमी 123 दिवस जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले, 7 व्या महिन्यात सिझेरियन प्रसूतीने झाला जुळ्यांचा जन्म

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रँकलिन पती मुरैल आणि मोठ्या मुलीसोबत. - Divya Marathi
फ्रँकलिन पती मुरैल आणि मोठ्या मुलीसोबत.
कॅम्पो लार्गो (ब्राझील) - ब्राझीलच्या वैद्यकीय इतिहासात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे एका ब्रेन डेड महिलेला तिच्या गर्भातील तीन महिन्यांच्या जुळ्या मुलांना वाचवण्यासाठी १२३ दिवस जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले गेले. महिलेने सातव्या महिन्यात सिझेरियन प्रसुतीने जुळ्या मुला-मुलीला जन्म दिला. तथापि, शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा जीव वाचवता आला नाही. मुलाला जन्म देण्यासाठी महिलेला लाइफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्याचा हा आजवरचा विक्रमी काळ आहे. याआधीचा विक्रम १०७ दिवसांचा होता. 
 
फ्रँकलिन दा सिल्वा जंपोली पाडिलहा ही २१ वर्षांच्या महिलेला सेरेब्रल हॅमरेजमुळे गतवर्षी कॅम्पो लार्गोतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आधी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, नंतर समजले की तिच्या हृदयाची धडधड सुरुच आहे. फ्रँकलिन ब्रेन डेड झाली होती. तपासणीत ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर डॉक्टरांनी तिच्या गर्भातील जुळ्यांना वाचवण्यासाठी तिला चार महिने जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले. गर्भातील बाळांना आईचे प्रेम व स्पर्शाची अनुभूती व्हावी म्हणून अायसीयूतील फ्रँकलिनचे बेड फुलांनी सजवण्यात आले होते. म्युझिक थेरेपेही देण्यात आली. फेब्रुवारीत सिझेरियन डिलिव्हरीनंतर जीवनरक्षक प्रणाली काढून घेण्यात आली. प्रीमॅच्युअर डिलिव्हरीमुळे बाळांना तीन महिने इन्क्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. मेमध्ये बाळांना डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हाची ही घटना आता चर्चेत आली अाहे. फ्रँकलिनचा पती मुरैलने मुलाचे नाव असाफ आणि मुलीचे अॅना व्हिक्टोरिया ठेवले आहे. मुरैल म्हणाला, गतवर्षी ऑक्टोबरमध्ये मी कामानिमित्त बाहेर गेला होते. अचानक फ्रँकलिनचा फोन आला, ती म्हणत होती माझ्या डोक्यांत प्रचंड वेदना होत आहेत. मी तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केले.
 
चार महिने रोज चेकअप
नोसो सेनहोरा डा रोकियो रुग्णालयाचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. डॉलटन रियावेम म्हणाले, ‘भ्रूणाचे अल्ट्रासाउंड केल्यानंतर वाटले की ते मृत झाले असतील. मात्र, ते जिवंत असल्याचे पाहून आम्ही चकित झालो. फ्रँकलिनचे अवयव भ्रूणांना सपोर्ट करत होते. त्यांना वाचवण्यासाठी आईला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले. प्रसूती होईपर्यत फ्रँकलिनचे दररोज चेकअप केले जात होते.’
बातम्या आणखी आहेत...