आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील दुसऱ्या शक्तिशाली व्यक्तीला बनायचे आहे अधिक शक्तिमान!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुतांश राष्ट्रपती आपले सुरुवातीचे निर्णय मित्र वा थिंक टॅँक किंवा विश्वासूंच्या मतानुसार घेतात. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या निर्णयात त्यांचे सल्लागार स्टीफन बॅनन यांची प्रमुख भूमिका आहे. हे निर्णय एखाद्या चित्रपटात शोभावेत असे आहेत. ट्रम्प सरकारची पहिली पावले त्यांच्या आश्वासनरुप खळबळ माजवणारी आहेत. याचे शिल्पकार आहेत बॅनन. बॅनन यांनी वॉशिंग्टन पोस्टला केलेल्या इ-मेलमध्ये लिहिले आहे, आम्ही एका नव्या राजकीय व्यवस्थेला जन्म देत आहोत.

बॅनन यांचा प्रभाव ट्रम्प प्रशासनात ठाई ठाई दिसतो. शपथग्रहण सोहळ्यातील ट्रम्प यांचे कठोर भाषण तसेच सात मुस्लिम राष्ट्रातील निर्वासितांवर प्रतिबंध या निर्णयांच्या पाठीमागे बॅनन आहेत. त्यांनी स्वत:ची नियुक्ती नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलमध्ये केली आहे. ट्रम्प यांनी ३० जानेवारीला एक ट्वीट केले होते. राष्ट्रीय माध्यमे आपल्या विरोधी पक्षाचे काम करतायेत असे ते म्हणाले होते. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्समध्ये बॅनन यांचे अशाच आशयाचे वक्तव्य प्रकाशित झाले होते. बॅनन राष्ट्रपतींचे एकमेव पुरुष सहाय्यक आहेत. ट्रम्प यांच्या कार्यालयात ते सूट-टायविना प्रवेश करू शकतात.

 ट्रम्प-बॅनन यांची तुलना करणे तसे कठीणच आहे. दोघेही अब्जाधिश आहेत. त्यांना एका साच्यात बसवता येणार नाही. बॅनन रिपब्लिकन आणि ़डेमोक्रॅटिक पक्षांना भ्रष्ट मानतात. या विचारसरणीमुळे त्यांना एक खळबळजनक व्यक्ती बनवून टाकले आहे. प्रशासनाच्या पहिल्या दहा दिवसात बॅनन यांची प्रमुख भूमिका, पसरलेल्या गैरसमजामुळे व्हाइट हाऊसचा प्रशासकिय भाग असलेल्या वेस्ट विंगला घेरले होते. प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनुसार ट्रम्प यांनी आपल्या अर्धा डझन सल्लागारांची चांगलीच परीक्षा घेतली. त्यांनी निर्देश दिले आहेत की, प्रत्येक निर्णय चीफ ऑफ स्टाफ रीन्स प्राइबसच्या यांच्या माध्यमातूनच जायला हवा. 

दुसऱ्या सल्लागारांनी ट्रम्प यांना बदलण्यासाठी प्रयत्न केले. दुसरीकडे बॅनन त्यांना अधिकाधिक आक्रमक होण्याचे सूचवत आहेत. बॅनन यांनी सुरुवातीच्या काही दिवसात ट्रम्प यांची प्रतिमा विध्वसंक बनवून सादर केली. रिपब्लिकन पक्षाचे एक वरिष्ठ नेते सांगतात, सर्व काही संपले आणि बॅनन जिंकले. ट्रम्प व बॅनन नवीन मार्गांवर  चालण्यासाठी आतुर आहेत. पुढे काय होईल हे रहस्यच आहे. बॅनन रेडिओ शोमधून वारंवार सांगतात की, जगभर कट्टरपंथी जिहाद्यांविरुद्ध युद्ध करणार. ही अस्तित्त्वाची ग्लोबल लढाई आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा मोठ्या युद्धाचे संकेत मिळतात. त्यांचे म्हणणे होते की, चीनविरुद्धही युद्धाचे संकेत मिळत आहेत.

माजी खासदार बॅचमन म्हणतात की, बॅनन यांनी जे ताडले ते मुख्य प्रवाहातील माध्यमे समजू शकली नाहीत. त्यांनी उपेक्षितांना व्यासपीठ प्रदान केले. त्यांच्याबद्दल ही मुख्य प्रवाहातील माध्यमे नेहमी खोटे बोलत आली. ब्रीटबार्टमध्ये बॅनन एक जोशपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. माजी संपादक बेन शापिरो म्हणतात की, ज्या लोकांशी मी परिचित आहे, त्यातील सर्वात वाईट लोकांपैकी ते एक आहेत. ते लोकांना नेहमीच शिव्या घालतात. ते आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी तत्पर असतात. ब्रीटबार्टमध्ये काम करणारी डाना लोएस्च गतवर्षी आपल्या एका रेडिओ शोमध्ये म्हणाली होती, पृथ्वीवरील ती खराब व्यक्ती आहे.

बॅनन यांच्या रुपाने ट्रम्प यांना आवडता सहकारी मिळाला आहे. ते राष्ट्रपती निवडणुकीदरम्यान ट्रम्प यांना आपल्या रेडिओ शोवर सादर करत. त्यांनी स्टाफळा ट्रम्प समर्थनीय बातम्या द्यायला सांगितले होते. ब्रीटबार्टमधील आधीचा स्टाफ व्हाइट हाऊसमध्ये प्रमुख जागांवर नियुक्त करणे  आणि राष्ट्रपतींच्या डेस्कजवळ बॅननचेे आदर्श अँड्रयू जॅक्सन यांचे छायाचित्र लावण्यासह राष्ट्रपतींच्या इतर निर्णयांवर बॅनन यांची छाप स्पष्ट दिसते.

ट्रम्प यांचे एक जुने सहाय्यक सांगतात, धोरणे ठरवण्याबाबत बॅनन यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो. निवडणुकीआधी ट्रम्प आणि बॅनन यांनी एक यादी तयार केली होती. सत्तेत आल्यानंतर ती कामे त्यांनी प्राधान्याने केली.  सल्लागार सांगतात की, ट्रम्प ठरवतात की कोणत्या कामांना मंजुरी द्यायची. 

व्हाइट हाउसमध्ये खळबळ : आक्रमक आणि निर्णयांनी व्हाइट हाऊसमध्येही तणाव निर्माण केला आहे.  सीनियर स्टाफचे सदस्य सांगतात की, ट्रम्प यांनी चीफ ऑफ स्टाफ प्राइबस यांना काही विशिष्ट निर्देश दिले आहेत. प्रशासनातील सुत्रांनुसार बॅनन आणि राष्ट्रपतींचे वरिष्ठ धोरण सल्लागार स्टीफन मिलर यांनी नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल मार्फत प्रसिद्ध केलेली कागदपत्रे माध्यमांत लीक होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर निर्वासितांवर बंदीचा आदेश गोपनीय पद्धतीने जारी करण्यात आला. अनेक कागदपत्रांबाबत कॅबिनेट सदस्य आणि काँग्रेस सदस्यही अनभिज्ञ आहेत.

बॅनन कोण आहेत?
- 1953 मध्ये आयरिश कॅथोलिक परिवारात जन्म.
- 1983 - 85 : हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए. 
- 1980 दशकाच्या शेवटी गोल्डमॅन साक्समध्ये काम केले. 1990 मध्ये ब्युटीक इन्वेस्टमेन्ट बँक उघडली.
- 1990 दशकाच्या शेवटी चित्रपटांची निर्मिती.
- 2011 : ब्रीटबार्ट न्यूज बोर्डमध्ये सहभागी. 2012 मध्ये ब्रीटबार्ट यांच्या मृत्युनंतर न्यूज नेटवर्कचेे सीईओ. } अॉगस्ट 2016 मध्ये ट्रम्प अभियानाचे  सीईओ. }नोव्हेंबर 2016 मध्ये ट्रम्प यांचे सल्लागार.

पत्नीला मारहाण केल्याचा आरोप
१९९६ मध्ये पत्नीशी वादानंतर बॅनन यांच्यावर घरगुती हिंसेचा आरोप झाला होता. मात्र पत्नीने त्यांच्याविरुद्ध जबाब द्यायला नकार दिला. त्यामुळे प्रकरण मिटले. त्यानंतर पत्नीने दावा केला की, बॅनन यांनी एका खासगी शाळेत मुलीच्या शिकण्यावर आक्षेप घेतला. त्या शाळेत यहुदी विद्यार्थी मोठ्या संख्येने होते. बॅनन यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले.
बातम्या आणखी आहेत...