आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायटॅनिक बुडण्याचे खरे कारण बॉयलरमधील आग, नवीन माहितीपटाचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- शतकभरापूर्वी टायटॅनिकचा शोकांत झाला होता. हे महाकाय जहाज हिमनगाला धडकल्याने समुद्रात त्याला जलसमाधी मिळाली, असा आतापर्यंतचा कयास होता. परंतु तो वास्तवाला धरून नाही. जहाजाच्या बॉयलर रूममध्ये लागलेल्या आगीनंतर ते बुडाले, असा दावा एका नवीन माहितीपटातून करण्यात आला आहे. 
 
बॉयलर रूममध्ये आग लागल्यामुळे जहाजाचे नियंत्रण करणाऱ्या चाकाची यंत्रणा पूर्णपणे कमकुवत बनली. बॉयलर रूममधील कोळशामुळे तो धुमसत होता.

खरे तर ही धुमसणारी आग बेल फास्ट येथील बंदर सोडल्यापासून  होती, असा दावा आयरिश पत्रकार तथा लेखक सेनन मॉलॉनी यांनी माहितीपटातून केला आहे. जहाजाचा जो भाग जळाला. त्याच भागावर हिमनगाचा तडाखा बसला होता. त्यामुळे मॉलॉनी यांच्या दाव्याची पुष्टी होते. मॉलॉनी गेल्या ३० वर्षांपासून या घटनेमागील सत्य शोधण्यासाठी अभ्यास करत आहेत. जहाजाचा प्रवास सुरू झाल्यापासून ही आग लागली होती. याबद्दल केवळ जहाज कंपनीचे अध्यक्ष जे. ब्रुस इस्मे यांना कल्पना होती, असे मॉलॉनी यांचे म्हणणे आहे.  

वेगळ्या वादळाचा परिणाम  
आग, हिमनगाची धडक आणि अक्षम्य दुर्लक्ष यातून ही टायटॅनिकची घटना घडली. ती केवळ हिमनगाला धडकलेली जहाज अशी साधी-सोपी गोष्ट नाही. आग, अक्षम्य दुर्लक्ष यासारख्या वादळाचा परिणाम म्हणून त्याकडे बघावे लागेल, असे मॉलॉनी यांनी सांगितले.  

मांडलेला तर्क  
जहाजाचे नियंत्रण करणाऱ्या चाकाच्या यंत्रणेला बॉयलरमधून धुमसणारी गुप्त आग लागलेली होती. सुरुवातीच्या टप्प्यातच ती लागली होती. म्हणूनच टायटॅनिक गोठलेल्या पाण्याच्या प्रदेशातून देखील वेगाने जात होती. वास्तविक महाकाय जहाज बर्फावरून वेगाने जाऊ शकत नाही, परंतु गुप्त आगीमुळेच टायटॅनिक सागरी बर्फाळ प्रदेशातून वेगाने जाऊ शकली, असे मॉलॉनींनी म्हटले. 

दीड हजारावर मृत्यू  
१९१२ मध्ये टायटॅनिकची शोकांतिका घडली. त्यात सुमारे १ हजार ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला हाेता. 
बातम्या आणखी आहेत...