आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियन अब्जाधीश आंद्रे मेल्निशेंकोने 3,000 कोटींत खरेदी केली जगातील सर्वात मोठी, अत्याधुनिक लक्झरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिब्राल्टर-  रशियन अब्जाधीश आंद्रे मेल्निशेंको यांनी ३००० कोटी रुपयांत या सुपरयाटची खरेदी केली आहे. ही सुपरयाट तयार करण्यासाठी चार वर्षे लागली. त्यांच्या ताब्यात देण्यापूर्वी चाचणीसाठी ही सुपर लक्झरी याट जिब्राल्टरमध्ये थांबली होती. येथे कर्मचाऱ्यांनी याटची पूर्ण तपासणी केली. मेल्निशेंको यांचे “ए’ या अक्षरावर विशेष प्रेम आहे.
 
यासाठी या याटचेही नाव “ए’ ठेवण्यात आले आहे. याटमध्ये ३०० फूट उंच तीन चिमण्या असून या लंडनच्या टॉवर ऑफ बेनपेक्षाही १० फूट उंच आहेत. ही जगातील सर्वात मोठी आणि सर्वात अत्याधुनिक एकमेव याट आहे. या याटचा आकार एका मध्यम आकाराच्या कार्गोशिपच्या बरोबरीत आहे. याचे डिझाइन फ्रेंच इंटेरिअर फिलिप्स स्टार्क यांनी केली आहे. यात एक हायब्रीड डिझेल आणि इलेक्ट्रिक प्रॉपल्शन प्रणाली लागलेली आहे. ४५ वर्षीय आंद्रे मेल्निशेंको कोळसा आणि खतांचे व्यापारी आहेत. जगभरातील अब्जधीशांच्या २०१७ च्या फोर्ब्सच्या यादीत १३.२ अब्ज डॉलरच्या (सुमारे ८४८ अब्ज रुपये) संपत्तीसह त्यांना ८९ वा क्रमांक देण्यात अाला होता.    
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...